महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने पुन्हा शहराच्या नामांतराचा प्रश्न उचलला आहे. औरंगाबादला शिवसैनिक संभाजीनगर असे संबोधतात. हेच नाव सरकारने अधिकृत करावे, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचे सांगत पालकमंत्री रामदास कदम यांनी शहरातील गुंठेवारीचा प्रश्न नियमानुकूल केल्याची माहिती जाहीर सभेत दिली. विकासकामावर होणारी टीका लक्षात घेता शिवसेनेने पुन्हा एकदा शहराच्या नामांतराचा मुद्दा पुढे केला आहे. खासदार खैरे यांनीही भाषणात नामांतराचा मुद्दा कसा चर्चेत आला, त्यावर कशी कार्यवाही झाली, ते प्रकरण न्यायालयीन कसे झाले, याची माहिती दिली.
युती होणार!
महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भाजपकडूनही अधिक जागांसाठी मागणीचा रेटा वाढलेला आहे. मात्र, पालकमंत्री रामदास कदम यांनी दोन-चार जागा इकडेतिकडे, पण युती होईलच, असे सांगितले.