सातारा– श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळहा ६ जुलै ते ११ जुलै अखेर सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी वाहतुकीत बदल केला आहे. शुक्रवार दि.५ रोजीचे सकाळी सहा ते दि.९ रोजी रात्री बारा पर्यत फलटण येथून पुणे, निरा, लोणंद कडे जाणारी वाहतूक बारामती किवा वाठार स्टेशन येथून पूणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आहे.  दि.५ रोजीचे  सकाळी सहा पासून ते दि.८रोजी रात्री बारा पर्यत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणारे वाहनाखेरीज इतर वाहनांना बंद करण्यातत आली आहे.

हेही वाचा >>> अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ अनूनछत्र मंडळ ६५ कोटी खर्चाचे नवीन महाप्रसादगृह उभारणार, फडणवीस यांच्या हस्ते होणार भूमिपूजन

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान

  दि.५ रोजीचे सकाळी  नऊ पासून ते दि.१० रोजीचे दुपारी एक पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.  दि ५ रोजीचे मध्यरात्रीपासून ते दि ९ रोजीचे मध्यरात्रीपर्यंत   फलटण ते लोणंद या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.  दि.९ चे रात्रीच्या बारा वाजल्यापासून ते दि.११ रोजीचे दुपारी चार पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. दि.९ चे रात्रीच्या बारा पासून ते दि. ११ रोजीचे रात्री बारा पर्यंत नातेपुतेकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहतुक माळशिरस, अकलूज येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.

हेही वाचा >>> मराठा आरक्षण आंदोलन भरकटले : नरेंद्र पाटील

दि.९ रोजीचे रात्री बारा वाजल्यापासून ते दि.११ चे दुपारी चार पर्यंत नातेपुतेकडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहिवडी-सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक नातेपुते-दहीगाव-जांब-बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.  दि.९चे रात्री बारा पासून ते दि.११ चे दुपारी चार वा.पर्यंत नातेपुते-वाई- वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापूर-जावली-कोळकी-झिरपवाडी-विचुर्णी-ढवळपाटी- वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.  

१० रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड मुक्कामी सकाळी ६ वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवूनये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपुर रोडने बरड कडे जाण्याऐवजी फलटण-दहिवडी चौक-कोळकी शिगणापूर तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे. पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी ये-जा करतील याची इतर वाहनधारकांनी नोंद घ्यावी.