सांगली शहरात गणेशोत्सव काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीचे नियोजन पोलिसांनी केले असून यासाठी काही मार्गावर वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुनील फुलारी यांनी शहरात वाहतूक नियमनाचे आदेश दिले आहेत.
सांगली शहरात १७ ते २८ सप्टेंबरअखेर गणेशोत्सव काळात देखावे व गणेश विसर्जन पाहण्यासाठी विशेष करून वखार भाग, गणपती पेठ, कापड पेठ, मारुती रोड या ठिकाणी बहुसंख्य लहान मुले, स्त्रिया, पुरुष गर्दी करीत असतात. नागरिकांना व्यवस्थित देखावे पाहता यावेत तसेच कोणतेही वाहन गर्दीत घुसून नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू नये याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने हे वाहतूक नियमन करण्यात आले आहे.
शहरातील खालील मार्गावर मिरवणुकीची वाहने, पोलीस वाहने, अॅम्बुलन्स, फायर ब्रिगेड या वाहनांखेरीज सर्व वाहनांना १७, २१, २३ व २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते रात्री १२ या वेळेत तसेच २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून ते २८ सप्टेंबर रोजी रात्री १२ या वेळेत मनाई आदेश लागू केला आहे.
टिळक चौक ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, जोग ज्वेलर्स ते सराफ कट्टय़ाकडे जाणारा रस्ता, गारमेंट सेंटर ते मारुती चौकाकडे जाणारा रस्ता व बालाजी चौकाकडे जाणारा रस्ता, मत्रीण कॉर्नर ते करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, सांगली शहर पोलीस ठाणे ते करमरकर चौकाकडे जाणारा रस्ता, राजवाडा चौक ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, स्टेशन चौक ते टेलिफोन ऑफिसकडे जाणारा रस्ता, जुना बुधगाव रोड ते बायपासकडून वखारभागाकडे जाणारा रस्ता, जामवाडी कॉर्नर ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी ते तानाजी चौकाकडे जाणारा रस्ता, गवळी गल्ली ते झाशी चौकाकडे जाणारा रस्ता, मगरमच्छ कॉलनी (क्रॉस रोड) ते सराफ कट्टय़ाकडे जाणारा रस्ता, वसंतदादा समाधी स्थळ (क्रॉस रोड) ते गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता, नवसंदेश कार्यालय ते आनंद टॉकीजकडे जाणारा रस्ता, कामगार भवन ते आमराईकडे जाणारा रस्ता, देशपांडे बिल्डिंग (वखारभाग) ते पटेल चौकाकडे जाणारा रस्ता व वखारभाग ते गवळी गल्लीकडून हायस्कूल रोड व गणपती पेठेस मिळणारे सर्व रस्त्यांवर हे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
सांगली शहर येथील पर्यायी वाहतूक मार्ग पुढीलप्रमाणे- मिरजकडून येणाऱ्या व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी- पुष्पराज चौक-सिव्हिल हॉस्पिटल-झुलेलाल चौक-पत्रकार नगर कॉर्नर-आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तोच राहील), इस्लामपूरकडून येणाऱ्या व कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी- इस्लामपूर टोलनाका-बायपास-कॉलेज कॉर्नर-आपटा चौकी-पुष्पराज चौक-सिव्हिल हॉस्पिटल-झुलेलाल चौक-पत्रकारनगर कॉर्नर-आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तसेच राहील), तासगाव, विटाकडून सांगलीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी कॉलेज कॉर्नर-आपटा चौकी-पुष्पराज चौक-सिव्हिल हॉस्पिटल- झुलेलाल चौक-पत्रकारनगर कॉर्नर-आनंदी लॉज कॉर्नर ते कोल्हापूर रोड (परतीचा मार्ग तसेच राहील).
सांगलीत गणेशोत्सवात वाहतूक व्यवस्थेत बदल
सांगली शहरात गणेशोत्सव काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्गावर वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे.
Written by अपर्णा देगावकर
First published on: 17-09-2015 at 03:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in transport system in ganeshotsav festival in sangli