गारपिटीचा फटका द्राक्ष व अन्य बागायतदारांना बसला असतानाच, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातीलही आंबा व काजू बागायतदारांना बदलत्या वातावरणाचा फटका बसला आहे. तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, लहान मुलांची रुग्ण संख्या जास्त आहे.
गारपिटीचा फटका द्राक्ष व अन्य बागायतदारांना बसला आहे. तसाच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील आंबा व काजू बागायतदारांना त्याचा फटका बसला आहे. गेल्या काही वर्षांत बदलते हवामान, तापमान बागायतदारांना आर्थिक नुकसानीचे ठरत आहे.
सध्या उष्णता, थंडी-गारव्याची तीव्रता जाणवते. या बदलत्या हवामानामुळे आंबा फळाची घट झाली आहे. तसेच आंबा व काजू बागायतीचा मोहोर जळून गेला आहे. सुरुवातीला बागायतदारांना वातावरण चांगले होते, पण मध्यंतरी थंडी-गारव्याच्या बदलत्या चक्राने त्याचा फटका बसला आहे.
गेले काही दिवस रात्री थंडीचा गारवा व दिवसा उष्ण वातावरणासह दमट हवामानाचा फटका बागायतदारांना बसला आहे. तसेच अन्य फळांच्या बागायतीच्या पिकातही घट दिसत आहे. आंबा व काजूचे पीक यंदा चांगले होते, पण मध्यंतरीच्या बदलत्या हवामानाचा फटका या हंगामात बसला.
जिल्ह्य़ातील विस्तीर्ण सागरी किनाऱ्यावरून मध्यंतरी वारे वाहू लागले होते. या वाऱ्याचा फटकाही काही बागायतदारांना बसला. बागायतीच्या या नुकसानीत वाढच होत आहे, असे सांगण्यात आले.
या बदलत्या हवामानाचा फटका व धुके अर्थातच गारपिटीसारखी धुक्याची लहरही बागायतदारांना सहन करावी लागली होती असे सांगण्यात आले.
दरम्यान या बदलत्या हवामानाचा फटका लहान मुलांनाही बसला आहे. ताप, सर्दी, खोकला यासारखे प्रकार सुरू झाल्याने रुग्णालयात गर्दी झाली आहे. बदलत्या वातावरणाचा फटका अन्य रुग्णांनाही बसला आहे.

Story img Loader