वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट अंतराने गोचर करून शुभ आणि अशुभ योग तयार करतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो. अशातच आता मेष राशीत चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. हा योग एप्रिल महिन्यात सूर्य, राहू, बुध आणि गुरु यांच्या युतीतून तयार होईल. कारण गुरू १२ वर्षांनी मेष राशीत प्रवेश करणार आहे. या योगाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. परंतु ३ राशी अशा आहेत. ज्यासाठी हा काळ आर्थिक लाभाचा आणि प्रगतीचा ठरु शकतो.
मेष राशी –
चतुर्ग्रही योग मेष राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या लग्न स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा पाहायला मिळू शकते. जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. तसेच या वेळी तुम्ही भागीदारीत एखादा व्यवसाय सुरू करू शकता. तर नोकरदारांना नवीन ऑफर मिळण्याची शक्यता आहे. परंतु या काळात विवाहित लोकांना काही समस्या येऊ शकतात.
कन्या राशी –
कन्या राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग लाभदायक ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून आठव्या स्थानी तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काही आजारातून मुक्ती मिळू शकते. शिवाय तुमचे कौशल्य आणि अधिक जबाबदारी घेण्याच्या वृत्तीमुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होण्याचीही शक्यता आहे. या महिन्यात काही आर्थिक आव्हाने येऊ शकतात, म्हणजेच काही बिनकामाचा खर्च होण्याची शक्यता आहे.
धनु राशी –
चतुर्ग्रही योग धनु राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी तयार होत आहे. दरम्यान, या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तर तुम्हाला प्रेमसंबंधातही यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन कौशल्ये विकसित करण्यावर आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी हा काळ चांगला ठरु शकतो. या काळात तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)