कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाची लढत सर्वाधिक चुरशीची. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे समरजित घाटगे यांच्यात सामना होणार आहे. स्वाभाविकच दोघांनीही चांगलीच कंबर कसली आहे. जिथे मतदार तिथे जाऊन संपर्क ठेवण्यावर भर आहे. मुंबई, पुणे, इचलकरंजी येथील चाकरमानी गाठून संपर्क ठेवला जात आहे. अशीच एक भरगच्च संपर्क सभा इचलकरंजीत झाली. वक्ते नेत्याचा महिमा गात होते, कर्तृत्वाचे पोवाडे गात होते. आपला नेता किती प्रबळ, ताकदवर आहे हे दाखवण्याच्या भरात एका महिलेने ‘आमचे साहेब म्हणजे कुणी साधे सुधे नाहीत. दीडशे किलोचा पैलवान हायतीत ते. त्यांच्या खाली आले तर पलिकडच्याचा निभाव तरी लागेल का, असे म्हणत साहेबांचे वेगळ्याच पद्धतीने कौतुक केले. हे शब्द ऐकून साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित खुलले. तर बाकीच्यांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद नोंदवला.
चावडी : १५० किलोंचा पैलवान !
क्ते नेत्याचा महिमा गात होते, कर्तृत्वाचे पोवाडे गात होते. आपला नेता किती प्रबळ, ताकदवर आहे हे दाखवण्याच्या भरात एका महिलेने ‘आमचे साहेब म्हणजे कुणी साधे सुधे नाहीत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-10-2024 at 04:48 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavadi maharashtra political crisis maharashtra politics news maharashtra politics political chaos in maharashtra print politics news zws