दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यात येणा-या भागांतील पायाभूत विकासासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल १,००,००० कोटींच्या प्रकल्पांना मंजूरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यात येणा-या औरंगाबादमधील शेंद्रे भागाच्या विकासासाठी गुंतवणूक करण्यासाठी तयार असलेल्या तब्बल ३६ कंपन्यांबरोबर महाराष्ट्र सरकारने सामंजस्य-करार केले आहेत. यामध्ये मुख्यत्वेकरून पायाभूत सोयींच्या विकासावर भर देण्यात येणार आहे. यासाठी तब्बल १,००,००० कोटींची गुंतवणूक होणे महाराष्ट्र सरकारला अपेक्षित आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे देशाची आर्थिक राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यादरम्यान असणा-या भागांध्ये उत्पादन प्रक्रियेला चालना मिळेल. दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातंर्गत मराठवाड्यातील औरंगाबादजवळ असणा-या शेंद्रे-बिडकीन पट्ट्याचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा