भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनाव असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला का? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. शिवाय, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याचं मृत्यू झालेल्या दिवशी कर्जतच्या फार्म हाऊसवर काय झालं होतं? हे महाराष्ट्राला कळालं पाहिजे, असंही ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. त्यांचं हे ट्वीट वेगानं व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या ट्वीटनंतर निलेश राणेंनी पत्रकारांशी संवाद साधत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. “ठाकरेंनी आता त्यांची औकात ओळखावी, ते आता शून्य झाले आहेत. त्यांना आता कुत्रंही विचारत नाही. त्यामुळे त्यांनी राणेंच्या नादाला लागायचं नाही. आमच्यावर भुंकायला जे कुत्रे ठेवलेत, त्यांना पण ठाकरेंनी आवरायला सांगितलं पाहिजे. नाहीतर जाहीरसभा घेऊन सर्व गोष्टी बाहेर काढेन, अशा इशारा निलेश राणेंनी दिला आहे.

हेही वाचा- “काम नाही, धाम नाही, घरी जा बायको…” मंत्री चंद्रकांत पाटलांनी पत्रकाराला हुसकावलं, VIDEO व्हायरल

निलेश राणे ट्वीटमध्ये नेमकं काय म्हणाले?
“ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनावाच्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला का? स्वर्गीय मीनाताई (माँसाहेब) ठाकरे ज्या दिवशी गेल्या त्या कशा गेल्या? कुठल्या परिस्थितीत गेल्या? त्यादिवशी कर्जतच्या फार्म हाऊसवर काय झालं? हेदेखील महाराष्ट्राला एकदा कळालं पाहिजे” अशा आशयाचं ट्वीट निलेश राणेंनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chavhan surname man murder for beautiful person in thackeray family nilesh rane tweet rmm