कर्मचारी कल्याण निधीतून उभारलेल्या येथील महसूल भवनाचा अनधिकृत वापर व अतिक्रमण केल्याचा आरोप करून महसूल कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केलेले फसवणुकीचे गुन्हे म्हणजे कर्मचाऱ्यांविरुद्ध सुडबुध्दीने केलेली कारवाई असल्याचा आरोप डॉ. रवींद्र देशमुख यांनी येथे वार्ताहर परिषदेत केला. महसूल कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेने दहशत निर्माण झाली असून अन्यायविरुद्ध लढण्यासाठी संघटना केव्हाही आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महसूल कर्मचारी कल्याण समितीची शासकीय इमारत ही आपली खासगी मालमत्ता आहे, असे मानून या इमारतीतील दोन गाळे चहा कॅण्टीन आणि झेरॉक्स सेंटर साठी भाडय़ाने देऊन शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली डॉ.रवींद्र देशमुख, गजानन टाके, नंदू बुटे, अशोक कटय़ारमल या चौघांविरुध्द जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांच्या आदेशावरून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डॉ. रवींद्र देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन न्या. धर्माधिकारी व न्या. देशमुख यांच्या खंडपीठातून ‘पुढील आदेशापर्यंत या चारही कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करू नये’ असा आदेश मिळवला आहे. तरीही टाके, बुटे आणि कटय़ारमल या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची सेवानिवृत्त झालेल्या डॉ. रवींद्र देशमुख यांची तक्रार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्याविरुद्ध गुन्हे दाखल केल्यामुळे आम्ही कॅण्टीन आणि झेरॉक्स सेंटरचा ताबा सोडून दिला आहे, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले की, महसूल भवनात कर्मचारी पतसंस्थेचे कार्यालय आहे. ते सरकार आणि संघटना यांच्या करारातून आम्ही घेतले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना ते कार्यालय खाली करून हवे असेल तर त्यांनी आम्हाला नोटीस द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्य़ांवरून जिल्हाधिकारी आणि महसूल कर्मचारी संघटना आमने-सामने
कर्मचारी कल्याण निधीतून उभारलेल्या येथील महसूल भवनाचा अनधिकृत वापर व अतिक्रमण केल्याचा आरोप करून महसूल कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-07-2015 at 07:11 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating in revenue office of yavatmal