Latest Petrol-Diesel Rates in Maharashtra: मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळतं आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात.
शहर | पेट्रोल (प्रति लिटर ) | डिझेल (प्रति लिटर ) |
अहमदनगर | १०३.८७ | ९०.४२ |
अकोला | १०४.०५ | ९०.६२ |
अमरावती | १०५.०५ | ९१.५८ |
औरंगाबाद | १०५.१२ | ९१.६२ |
भंडारा | १०४.९३ | ९१.४६ |
बीड | १०४.४९ | ९१.०२ |
बुलढाणा | १०४.७३ | ९१.२७ |
चंद्रपूर | १०४.०४ | ९०.६२ |
धुळे | १०३.९४ | ९०.४८ |
गडचिरोली | १०४.८४ | ९१.३८ |
गोंदिया | १०५.४७ | ९१.९८ |
हिंगोली | १०४.९९ | ९१.५१ |
जळगाव | १०५.५६ | ९२.०४ |
जालना | १०५.७४ | ९२.२१ |
कोल्हापूर | १०४.४८ | ९१.०२ |
लातूर | १०५.२९ | ९१.८० |
मुंबई शहर | १०४.२१ | ९२.१५ |
नागपूर | १०३.९६ | ९०.५२ |
नांदेड | १०५.८१ | ९२.३१ |
नंदुरबार | १०५.०० | ९१.५१ |
नाशिक | १०४.६८ | ९२.६२ |
उस्मानाबाद | १०५.२८ | ९१.७९ |
पालघर | १०४.८२ | ९१.२९ |
परभणी | १०७.३९ | ९३.७९ |
पुणे | १०४.०८ | ९०.६१ |
रायगड | १०३.८१ | ९०.३२ |
रत्नागिरी | १०५.५२ | ९१.९६ |
सांगली | १०४.४३ | ९०.९८ |
सातारा | १०४.९१ | ९१.४१ |
सिंधुदुर्ग | १०५.९२ | ९२.४१ |
सोलापूर | १०४.१२ | ९०.६७ |
ठाणे | १०४.३९ | ९२.३३ |
वर्धा | १०४.४९ | ९१.०४ |
वाशिम | १०४.५७ | ९१.११ |
यवतमाळ | १०४.८७ | ९१.४० |
आजचे जाहीर झालेले पेट्रोल-डिझेलचे दर पाहता अहमदनगर, अमरावती, गडचिरोली, हिंगोली,नांदेड, रायगड, सातारा या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात किंचित दरवाढ तर उस्मानाबाद, परभणी, सांगली आदी शहरांत पेट्रोलचे भाव किंचित बदलले आहेत. तसेच डिझेलच्या किमती उस्मानाबाद, परभणी, सांगली या शहरांमध्ये कमी झाल्या आहेत. तर पालघरमध्ये डिझेलच्या दरात किंचित दरवाढ पाहायला मिळते आहे. तर उर्वरित शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
एसएमएसद्वारे पाहा पेट्रोल-डिझेलचे दर :
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.
महागड्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कधी दिलासा मिळतो याची सर्वसामान्य जनता आतुरतेने वाट पाहत असते.तर सरकारी तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास दररोज अपडेट करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. तर हे दर निश्तिच झाल्यावर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तुम्ही पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर वर नमूद केल्याप्रमाणे एसएमएसद्वारेही तपासून पाहा आणि घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.