नीलेश पवार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तीनशे वर्षांहून अधिकची परंपरा लाभलेला नंदुरबार येथील सारंगखेडा अश्व बाजार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने चेतक महोत्सवाच्या माध्यमातून आंतराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. देशभरातून तब्बल अडीच हजार अश्व यंदा खरेदी-विक्रीसाठी दाखल झाले आहेत. वेगवेगळ्या जातींचे ५० हजार ते तब्बल दोन कोटीपर्यंत किंमत असणारे अश्व पाहावयास मिळतात. ग्रामीण भागातील यात्रेला दिलेल्या ‘कॉर्पोरेट’ चेहऱ्याने देश-विदेशातील पर्यटकांची पावले सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबारच्या दिशेने पडत आहेत. या निमित्ताने आदिवासी भागातील पर्यटन स्थळांचे विपणन आणि रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची स्थानिकांना आशा आहे.
राज्यातील बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती आहे. सारंगखेडय़ात भरणाऱ्या चेतक महोत्सवास कोटय़वधीचा निधी देण्यास यंदा मोठय़ा प्रमाणात विरोध होता. मात्र पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने महोत्सवास साडेचार कोटींच्या आसपास निधी दिला. दोन वर्षांपासून या स्थानिक उत्सवाला जागतिक रूप देण्याकरिता गुजरातमधील कच्छच्या रणात महोत्सव आयोजित करणाऱ्या संस्थेशी करार करण्यात आला. यामुळे सारंगखेडा यात्रेचा चेहरामोहरा बदलला आहे. सारंगखेडा चेतक महोत्सवाने यात्रेला विलक्षण झळाळी प्राप्त झाल्याचे लक्षात येते. पर्यटकांसाठी सांस्कृतिक, कला, क्रीडा अशा कार्यक्रमांची जोड देत अश्वप्रेमींना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या खास अश्व स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित केल्या जात आहेत. पर्यटकांना निवासासाठी तापी तीरावर खास तंबू उभारण्यात आले आहेत. पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सुविधा असलेल्या तंबूच्या शहरात पर्यटकांच्या आवडीनिवडीनुसार खास व्यवस्था करण्यात आली आहे. मनोरंजनासाठी चेतक महोत्सवात लावणीपासून ते कलाकारांचे विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. चेतक महोत्सवास भेट देणाऱ्या पर्यटकांना पाण्यातील खेळ अर्थात नौकानयन, स्पीड बोटची अनुभूती देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ‘स्पा’पासून बिलियर्डसपर्यंत सारे एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही लक्षवेधी ठरले आहे. अश्व चित्रकला स्पर्धेने जगातील चित्रकारांनी अश्वांच्या विविध छटा रेखाटल्या आहेत. स्थानिक महिलांच्या कला-कौशल्याला वाव देण्यासाठी बचत गटांना महोत्सवात स्वतंत्र कक्ष देण्यात आले.
राज्याच्या एका कोपऱ्यात वसलेल्या नंदुरबारमधील पर्यटन केवळ सारंगखेडापुरते मर्यादित न राहता थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ, तीर्थक्षेत्र प्रकाशा, गरम पाण्याचे झरे असलेले उनपदेवपर्यंत पर्यटकांना आकर्षित करण्याचा पर्यटन विभागाचा प्रयत्न आहे. देश-विदेशात यात्रेचा गवगवा होत असतांना स्थानिक पातळीवर मात्र प्रचार करण्याचा महामंडळाला विसर पडला. त्यात प्रथमच दत्त जयंतीऐवजी महोत्सव आठ दिवस अगोदर सुरू करण्याची आयोजक आणि पर्यटन विभागाची कल्पना फोल ठरली. यात्रोत्सवात दत्त जयंतीनंतर खऱ्या अर्थाने उत्साह दिसू लागला आहे. यात्रेला जागतिक रूप देण्यासाठी जपानचे मंडळ आणि काही परदेशी पाहुण्यांनी भेट दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तीन वर्षांपासून यात्रेला आवर्जून भेट देत आहेत. नंदुरबारची सारंगखेडा यात्रा आता साता समुद्रापार पोहचली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
सारंगखेडा यात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. कधीकाळी या बाजारात पाकिस्तान आणि आसपासच्या भागातून अश्व विक्रीसाठी येत असत. आज देशभरातून अश्व या बाजारात खरेदी-विक्रीसाठी येतात. अश्वप्रेमी आवर्जून सहभागी होतात. अश्वांची खरेदी-विक्री होऊन मोठी उलाढाल होते. चित्रपटांत जे अश्व चित्रीकरणासाठी वापरले जातात, त्यांची खरेदी याच बाजारातून होते. यात्रोत्सवाच्या निमित्ताने सारंगखेडय़ाची जगाला ओळख व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी, हा चेतक महोत्सवाचा उद्देश आहे. हा यात्रोत्सव ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. या वर्षी प्रारंभीच्या काही दिवसांत यात्रोत्सवात भेट देणाऱ्यांची संख्या २० टक्क्य़ांनी वाढली आहे.
सारंगखेडा अश्व बाजारात सुमारे अडीच हजारहून अधिक अश्व खरेदी-विक्रीसाठी दाखल झाले आहेत. या व्यवहारातून आतापर्यंत पावणे दोन कोटींची उलाढाल झाली. या बाजारात ५० हजार ते दोन कोटींपर्यंत किमतीचे अश्व आहेत. मारवाडी जातीच्या अश्वांची किंमत दीड ते दोन कोटींच्या घरात आहे. काठेवाडी, मुखडा अर्थात संपूर्ण पांढरा अशा अश्वांची २५ ते ५० लाखापर्यंत किंमत आहे. शेतकरी, शौकीन, वरातवाले, चित्रपटात चित्रीकरणासाठी वापरणारे आदी घटक आपल्या आवडीनिवडीनुसार अश्वांची खरेदी करीत आहेत.
– जयपालसिंग रावल (आयोजक, चेतक महोत्सव स्थानिक समिती)