Chhaava Movie Controversy Political Reaction : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर नेतेमंडळी व सामाजिक संघटनांकडून आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे. यावरून समाजमाध्यमांवरून अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर, काही संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागल्या आहेत. या आक्षेपार्ह प्रसंगावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. छावा चित्रपटातील आक्षेपार्ह बाबी वगळून तो प्रदर्शित करावा, अशा सूचना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना केली आहे. छावा चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला जात असल्याने त्यावरून उदयनराजे यांनी उत्तेकर यांच्याशी चर्चा करीत वरील सूचना केली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना व नृत्य करताना दिसत आहेत. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. लेझीम खेळणे चूक नाही. पण त्या गाण्यावर नृत्य करणे, हे कितपत योग्य आहे? सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये हे घ्यायला हवे का? यावर चर्चा करणे आवश्यक आहे”.

Uday Samant on chhava movie
Chhava Movie Controversy : अखेर छावा चित्रपटातला ‘तो’ वादग्रस्त भाग काढला; मंत्री उदय सामंत म्हणाले…
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”
Chhava Movie
‘छावा’मध्ये ‘ती’ वादग्रस्त दृष्ये का घेतली? दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी संगितलं नेमकं कारण
Aaditya Thackeray alleged Sanjay Gupta
Aaditya Thackeray : “हे लज्जास्पद आहे”, शिवसेनेच्या तोतया प्रवक्त्यावर संतापले आदित्य ठाकरे; करणार कायदेशीर कारवाई
Mohammed Siraj Zanai Bhosle Affair Asha Bhosle Granddaughter Breaks Silence on Relationship Rumours with Instagram Story
Mohammed Siraj Zanai Bhosle: मोहम्मद सिराज व आशा भोसलेंची नात खरंच एकमेकांना डेट करतायत? जनाईने फोटो पोस्ट करत केला खुलासा
Torres Scam
Torres Case Update: टोरेस कंपनीच्या CEO ला पुण्याजवळून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई!
Amit Shah maha kumbh ANI
Maharashtra Breaking News Updates : महाकुंभ : अमित शाहांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान

उदयनराजे भोसले काय म्हणाले?

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट बनणे ही आनंदाची गोष्ट आहे. छत्रपतींचा इतिहास जगाला समजावा यासाठी असे प्रयत्न आवश्यक आहेत. मात्र, या चित्रपटात काही आक्षेपार्ह दृश्ये असल्याची मते व्यक्त केली आहेत. हा चित्रपट तज्ज्ञ आणि जाणकारांना आधी दाखवण्यात यावा. त्याशिवाय तो प्रदर्शित करू नये, अशी आमची भूमिका आहे. महाराजांच्या सन्मानाला बाधा पोहोचेल, अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही.

…अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही : उदय सामंत

दरम्यान, यावर राज्य सरकारची भूमिका समोर आली आहे. उद्योग मंत्री शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते उदय सामंत यांनी देखील या चित्रपटात योग्य ते बदल न केल्यास चित्रपट प्रदर्शित करु दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सामंत म्हणाले, चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शकांनी तातडीने याबाबत उपाययोजना करून आक्षेपार्ह काही असेल तर ते काढून टाकलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. चित्रपट पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, त्याशिवाय हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही!

Story img Loader