Chhaava Movie Controversy Political Reaction : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर नेतेमंडळी व सामाजिक संघटनांकडून आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आलं आहे. यावरून समाजमाध्यमांवरून अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर, काही संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागल्या आहेत. या आक्षेपार्ह प्रसंगावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. छावा चित्रपटातील आक्षेपार्ह बाबी वगळून तो प्रदर्शित करावा, अशा सूचना साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांना केली आहे. छावा चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतला जात असल्याने त्यावरून उदयनराजे यांनी उत्तेकर यांच्याशी चर्चा करीत वरील सूचना केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा