मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता अजित पवार यांनी स्वत: पक्षातील जबाबदारी मिळावी आणि विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. अजित पवार यांचं विधान ताजं असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यात ५४ टक्के समाज ओबीसी आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्याला मिळावं, अशी इच्छा छगन भुजबळांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा- अजित पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविणार का?

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, “राज्यात ओबीसी समाज ५४ टक्के आहे. तो समाज आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणावर जोडला जाऊ शकतो. इतर पक्षांनी त्यासाठीच त्यांचे ओबीसी अध्यक्ष नेमले आहेत. आमच्या पक्षातही ओबीसी नेते खूप आहेत. सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड असे नेते आहे. मला जबाबदारी मिळाली तर मीही काम करेन.”

हेही वाचा- “विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा”,अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या “माझ्या भावाच्या सर्व इच्छा…”,

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

‘‘विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती. पण, आमदारांचा आग्रह आणि त्यांनी स्वाक्षऱ्या गोळा केल्याने ते पद स्वीकारले आणि गेले वर्षभर काम केले. पण काही नेत्यांचं म्हणणं आहे की, मी कठोर वागत नाही. मग मी सत्ताधारी नेत्यांचं कॉलर पकडायला हवी का? पण आता हे पुरे झाले, मला पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या’’, असं अजित पवार म्हणाले. या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ आदी नेते उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujabal statement on ncp president after ajit pawar rmm