Chhagan Bhujbal dropped from Ministerial Post : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे (अजित पवार) आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळल्याने त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे. मराठा आरक्षणावरून घेतलेली आक्रमक भूमिका, पक्षाची झालेली अडचण, मुलाला विधान परिषदेत पाठवलेलं असताना पुतणे समीर भुजबळ यांची नांदगावमध्ये बंडखोरी, चौकशीत अडकलेली प्रकरणे आदींचा संबंध भुजबळांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याशी जोडला जात आहे. दरम्यान, मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा कालपासून रंगत होत्या. अखेर आज (१६ डिसेंबर) त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांची नाराजी उघड केली. भुजबळ म्हणाले, “मी नाराज आहे. पुढे काय? ज्यांनी मला डावललं त्यांना तुम्ही (प्रसारमाध्यमं) प्रश्न विचारायला हवेत”.

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला पक्षाने, महायुतीतील नेत्यांनी मंत्रिपदापासून का डावललं? त्यावर भुजबळ म्हणाले, “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय नि फेकलं काय… कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं”.

What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Maharashtra Assembly Winter Session Live Updates
Maharashtra Assembly Winter Session Live Updates : छगन भुजबळांना राज्यसभेची ऑफर; म्हणाले, “सात-आठ दिवसांपूर्वी…”
Rane Family
Uddhav Thackeray : “राणेंना संपवता संपवता तुमचं…”, नितेश राणेंनी शपथ घेताच उद्धव ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis Cabinet (1)
कसं आहे फडणवीसांचं मंत्रिमंडळ? २० नवे चेहरे, चार महिला व सहा राज्यमंत्री, १७ जिल्ह्यांची पाटी कोरीच; जाणून घ्या २० महत्त्वाचे मुद्दे
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Devendra Fadnavis Cabinet Satara Vidarbha
सातारा-पुणे तुपाशी, तर अर्धा विदर्भ उपाशी! राज्यातील १७ जिल्हे मंत्रिपदापासून वंचित
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> Zakir Hussain Passes Away : सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांचं निधन, ‘वाह उस्ताद वाह’ म्हणत तबल्यावर लिलया पडणारी थाप शांत!

अन् भुजबळांनी नाराजी प्रकट केली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, अजित पवारांच्या अभिनंदनाचे, नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनाचे होर्डिंग ठिकठिकाणी लागले आहेत. त्यावर भुजबळांचा फोटो छापलेला नाही. त्यावरून भुजबळांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “कधी कधी होर्डिंगवर जागा नसते”. दरम्यान, त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही पक्षावर नाराज आहात का? यावर भुजबळ म्हणाले, “होय, मी नाराज आहे. पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे”. यावर त्यांना विचारण्यात आलं की तुमचं अजित पवार (पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष), सुनील तटकरे (पक्षाचे प्रदेशाध्यक्ष) यांच्याशी काही बोलणं झालं आहे? यावर भुजबळ म्हणाले, “मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही”.

हे ही वाचा >> सातारा-पुणे तुपाशी, तर अर्धा विदर्भ उपाशी! राज्यातील १७ जिल्हे मंत्रिपदापासून वंचित

आता शरद पवारांकडे परत जाणार? भुजबळ म्हणाले…

मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यानंतर आता पुढची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर भुजबळ म्हणाले, “मी माझ्या लोकांशी बोलेन, माझ्या मतदारसंघातील जनतेशी, माझ्या कार्यकर्त्यांशी, समात परिषदेतील लोकांशी बोलून पुढची भूमिका ठरवेन”. माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळांना आता शरद पवारांकडे जाणार का? असा प्रश्न देखील यावेळी विचारला, त्यावर ते म्हणाले, “मी १२ डिसेंबर रोजी शरद पवारांना भेटून आलो आहे”.

Story img Loader