राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. जुन्या नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश केला जाणार असल्याने राज्यातल्या अनेक ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध दर्शवला आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे या आरक्षणाला विरोध करत आहेत. तसेच भुजबळ यांनी जालना आणि हिंगोली येथे ओबीसी एल्गार सभा आयोजित करून या सभांमधून मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर कडाकडून टीकादेखील केली. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ आणि जरांगे यांच्यात मोठा वाद चालू आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होत असल्याची टीकादेखील होऊ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळांना रोखावं, अशी मागणी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याकडून होत आहे. यावर अजित पवार म्हणाले, सर्वच नेत्यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य कोणीही करू नये. तसेच एका बाजूला छगन भुजबळ हे मनोज जरांगेंविरोधात आक्रमक झालेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर कोणताही नेता त्यांच्याबरोबर उभा राहिलेला नाही. उलट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे भुजबळांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेताना दिसत आहेत. त्यामुळे छगन भुजबळांना पक्षाने एकटं पाडल्याची चर्चा होत आहे.

हे ही वाचा >> ‘खोके सरकार’ म्हणत सुप्रिया सुळेंची शिंदे सरकारवर टीका “छगन भुजबळांसारख्या कॅबिनेट मंत्र्याला….”

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी, त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की, ओबीसी आंदोलनाच्या काळात तुम्हाला पक्षाने एकटं पाडलं आहे का? कारण पक्षातील कोणताही नेता तुमच्या बाजूने बोलत नाही. यावर भुजबळ म्हणाले, अजित पवार त्या दिवशी म्हणाले, प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे. मी जबाबदारीनेच बोलतोय. भाषणांवेळी कागदी पुरावे दाखवतोय. हे कागद, हे पुरावे म्हणजे जबाबदारी नाही का? मुळात माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे. तसेच माझा झुंडशाहीला विरोध आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal answer on why no one in ncp supporting in obc protest asc