Chhagan Bhujbal : मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचातरी राजीनामा घ्यावा हे माझ्या मनातही नाही. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की पूर्ण चौकशी झाली की आका, काका सगळ्यांवर कारवाई करु. त्याआधीच धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागितला जातो आहे? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची घाई का?

छगन भुजबळ म्हणाले, जोपर्यंत नक्की होत नाही, ठोस पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची घाई का? त्यांनी राजीनामा का द्यावा आणि कुणी मागावा? साप साप म्हणून भुई थोपटणं योग्य नाही. कारण नसताना, काहीही सिद्ध झालेलं नसताना राजीनामा घेणं मी तेलगी प्रकरणात सोसलं आहे असं छगन भुजबळ म्हणाले. राजकारणामध्ये अशा गोष्टी होत असतात. मला वाटतं की कुणावरही अन्याय होता कामा नये.

What sharad pawar wrote on that paper chhagan bhujbal says
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी त्या कागदावर काय लिहून दिलं होतं? छगन भुजबळांनी सांगितला पवारांचा ‘तो’ संदेश; म्हणाले…
Milind Bokil receives Social Awareness Award from Marwadi Foundation prabodhankar Thackeray
घरात धर्म आणि रस्त्यावर धम्म…
Dhananjay Munde and SambhajiRaje Chatrapati
“धनंजय मुंडेंना अजित पवार संरक्षण का देत आहेत?”, संभाजीराजे छत्रपतींचा थेट प्रश्न; म्हणाले, “मराठा वि. वंजारी…”
Devendra Fadnavis and sharad pawar
“घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीचा नामोल्लेख…”, संतोष देशमुख हत्याप्रकरणी शरद पवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Suresh Dhas Statement About Pankaja Munde and Dhananjay Munde
Suresh Dhas : “लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला, कारण..”; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे

संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे-भुजबळ

संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाली आहे. सुरेश धस यांनी या हत्येचं क्रौर्य सांगितलं. ते ऐकतानाही अंगावर काटा आला, या प्रकरणात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत वाईट पद्धतीने झाला. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, पण कायदा सांगतो त्याप्रमाणे जो निरपराध अपराध्याला शिक्षा होता कामा नये. मी कुणाची बाजू घेतो आहे असं नाही, जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “पवार कुटुंबानं, ठाकरे कुटुंबानं एकत्र यावं, आम्हाला..”; काय म्हणाले छगन भुजबळ?|Chhagan Bhujbal

अजित पवारांनी ते वक्तव्य करायला नको होतं-भुजबळ

मतदारांबाबत अजित पवारांनी असं बोलायला नको होतं. अशी प्रतिक्रियाही छगन भुजबळ यांनी दिली आहे. लोक, मतदार हे देशाचे मालक आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी तो अधिकार दिला आहे. बाकी मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांनी जरा संजय गायकवाड यांना समज दिली पाहिजे. माझ्याबद्दलही त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं. लाथ मारुन भुजबळांना बाहेर काढा असं ते म्हणाले होते. संजय गायकवाड जरा जास्तच बोलून जातात, त्यांना योग्य ती समज द्यायला हवी आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

“माणिकराव कोकाटे काल आले आहेत त्यांनी….”

माणिकराव कोकाटे यांना सांगायचं आहे छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे शरद पवारांसह असलेला. निशाणी घड्याळ, नाव कसं असलं पाहिजे? कोकाटे हे उपरे आहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांनी माणसं पाठवली त्यांना यायचं आहे म्हणून, शरद पवारांना सांगून मी त्यांना पक्षात घेतलं. कोकाटे काल आले आहेत मला बोलण्याचा त्यांना काय अधिकार? असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला आहे.

Story img Loader