मुंबईमधील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा षण्मुखानंद सभागृह येथे मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, नेते समीर भुजबळ उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळांनी अजित पवार आणि सुनील तटकरेंची प्रफुल्ल पटेलांकडे तक्रार करत शायरी केली आहे. यानंतर सभागृहात एकाच हशा पिकला.

छगन भुजबळ म्हणाले, “प्रफुल्ल भाई… अजित पवार आणि सुनील तटकरे माझी मस्करी करतात. मी त्यांना सांगू इच्छितो, ‘मैं उस पुराने जमानेका सिक्का हूं, मुझे फेंक न देना, हो सकता हैं बुरे दिनों मैं मेही चल जाऊ…'”

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Suresh Dhas Statement About Pankaja Munde and Dhananjay Munde
Suresh Dhas : “लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला, कारण..”; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?
ajit pawar group on suresh dhas
Suraj Chavan: “..तेव्हा गृहखातं झोपा काढत होतं काय?”, सुरेश धसांच्या विधानानंतर अजित पवार गटाच्या नेत्याची टीका

“शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे”

“मी राष्ट्रवादीचा पहिला प्रदेशाध्यक्ष झालो आणि कामाला सुरूवात केली. पण, तिकडे ( शरद पवार गट ) निर्माण झालेले अनेक नवीन नेते आमच्यावर टीका करतात. टीका करणाऱ्यांनी एवढं लक्षात घ्यावं, हा पक्ष निर्माण झालेला, तेव्हा तुमचा पत्ताही नव्हता. कुठे होता तुम्ही? तुमचा अजून राजकीय जन्म व्हायला होता. अनेक पक्ष स्थापन होतात. पण, पक्ष वाढवण्यासाठी काम करावे लागते. हा पक्ष शून्यातून वाढवला आहे. शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे,” असं छगन भुजबळांनी सांगितलं.

“आता कशाला आमच्याबद्दल दु:ख व्यक्त करत आहात”

“एका विशिष्ट परिस्थितीत आम्ही वेगळा निर्णय घेतला. ती परिस्थिती तुम्हीच निर्माण केली होती. एकदा नाहीतर सातवेळा सतत चर्चा केली. सगळ्या आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या होत्या. पण, प्रत्येकवेळी हो म्हणायचं आणि मागे सरकायचं. तळ्यात-मळ्यात सुरू होतं. मात्र, शेवटी आम्ही ठरवलं तळ्यात असो किंवा मळ्यात एकदाचं जाऊया. मग, आता कशाला आमच्याबद्दल दु:ख व्यक्त करत आहात,” असा सवाल छगन भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला विचारला आहे.

“लोकांची शक्ती म्हणजे पक्ष आहे”

“ग्रामचंपायत निवडणुकीत भाजपानंतर दोन नंबरला अजित पवारांचा पक्ष दुसऱ्या क्रमाकांवर आला आहे. ही आमची शक्ती आहे. तुमचा नंबर कितवा आला सांगा? फक्त चिन्ह म्हणजे पक्ष नाही. लोकांची शक्ती म्हणजे पक्ष आहे. पण, उरलेला पक्ष संपवायला बाहेरच्या लोकांची गरज नाही. हीच लोक लवकर पक्ष संपवतील,” असंही छगन भुजबळांनी म्हटलं.

“मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या”

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण द्या. हेच शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसही बोलत आहेत. पण, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या,” असा पुनरूच्चार छगन भुजबळांनी केला आहे.

Story img Loader