छगन भुजबळ कुणाला सॉफ्ट टार्गेट वाटत असेल तर मी हे सांगू इच्छितो की तसं ते नाही. अभिषेक मनु सिंघवी यांना शरद पवार गटाकडून चुकीची माहिती देण्यात आली आहे. शरद पवारांचे फोटो दाखवून मतं मिळवा हे मी बोललो नाही. शरद पवारांबरोबर काम करत होतो तेव्हाही कधी हे बोललो नाही. चिन्हावर मतं घ्या सांगितलं. घड्याळ चिन्ह आम्हाला निवडणूक आयोगाने दिलं आहे. निवडणूक जवळ आल्यावर आम्ही चिन्हाचा प्रचार करणारच. मात्र न्यायालयाची दिशाभूल करण्याचं काम केलं जातं आहे. ही गोष्ट तुमच्यासमोर आणायची होती त्यामुळे मी हे सगळं तुम्हाला सांगतो आहे.

मी शरद पवारांचा फोटो कुठे वापरला?

मी शरद पवारांचा फोटो कुठे वापरला आहे? ते सांगावं. मी फोटो आणि चिन्हाचा प्रचार करुन मतं मागितलेली नाहीत. त्यामुळे न्यायालयाची दिशाभूल केली जाते आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. घड्याळ हे पक्षचिन्ह आम्हाला दिलं आहे. छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागात शरद पवारांचा फोटो दाखवा आणि मतं मिळवा या बातम्या आल्या त्यावर मी स्पष्टीकरण देतो. इतर तांत्रिक गोष्टींवर आमचे वकील उत्तर देतील असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हे पण वाचा- “आम्हाला कमी लेखू नका”, छगन भुजबळांचा भाजपाला इशारा; जागावाटपाबाबत एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…

आणखी काय म्हणाले छगन भुजबळ?

अद्याप कुठलीही निवडणूक आलेली नाही. निवडणूक आली तरीही आयुष्यात कुणाचा तरीही फोटो दाखवा आणि मतं द्या असं मी बोललो नाही. शिवसेनेत असतानाही बोललो नाही. राष्ट्रवादीत असतानाही बोललो नाही. निवडणुकीच्या वेळी बॅनरवर फोटो असतात ते वेगळं. निवडणुकीच्या वेळी आपण हे सांगतो की आमचं चिन्ह पाहून मत द्या. फोटो दाखवायला प्रत्येक वेळी फोटो तिथे असतो का? असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी विचारला. मतदान केंद्रात कुठल्याही नेत्यांचा फोटो नसतो. अद्याप प्रचाराची वेळ आलेली नाही तरीही हे सांगितलं जातं आहे. माझं नाव घेऊन प्रकर्षाने हे सांगितलं जातं आहे त्यामुळे मी स्पष्टीकरण देत आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Story img Loader