अपक्ष आमदार तथा काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. तांबे कुटुंबीय तसेच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची बदनामी करण्यासाठी कट रचला गेला. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेले, असा खळबळजनक दावा सत्यजीत तांबे यांनी केला आहे. तांबे यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस पक्षातील याच अंतर्गत वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे भाष्य केले आहे. शरद पवार यांनी निवडणुकीपुर्वीच नाशिकच्या जागेवरील तिढा काँग्रेसने मिटवावा असे सूचलवे होते, असे भुजबळ म्हणाले आहेत. ते आज (५ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
सत्यजीत तांबेंच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “शरद पवारांनी अगोदरच…”
अपक्ष आमदार तथा काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Written by प्रज्वल ढगे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-02-2023 at 13:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal comment on satyajeet tambe allegations on congress and nana patole prd