मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वपक्षीय बैठकीला न आल्याने शरद पवार यांना शरद पवार यांच्यावर आरोप केला होता. शरद पवार हे आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहेत असं छगन भुजबळ म्हणाले होते. या आरोपांना आता जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांनी बारामतीहून फोन केल्याने सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातल्याचंही छगन भुजबळ म्हणाले होते. यावरही जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ यांचा आरोप काय?

“आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत.” असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.

हे पण वाचा- छगन भुजबळ यांचा शरद पवारांवर आरोप “पाठीमागून सल्ले द्यायचे आणि आरक्षणावरुन महाराष्ट्र पेटवण्याचं..”

आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे

“विरोधी पक्षातल्या नेत्यांना काहीतरी सल्ले द्यायचे. त्यानंतर पाठीमागून महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग करायचे. आम्ही सगळ्या विरोधी पक्षांना सांगतो आहे की सामाजिक प्रश्न सोडवत असताना मुद्दाम बहिष्कार टाकायचा, मुद्दाम तिथे यायचं नाही हे योग्य नाही. निवडणूक असेल तेव्हा तुमचे झेंडे हाती घ्या, तुमचे मुद्दे मांडा. आम्ही आमचे मुद्दे मांडतो, आमचे झेंडे हाती घेतो. मात्र सामजिक प्रश्नी सगळ्यांनी एकत्र यायला हवं. ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही, हे अजिबात योग्य नाही. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व समाजाचे लोक आहेत. सगळे आमचे आहेत आणि तुमचेही आहेत. एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला सुबुद्धी देओ” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. याच मुद्द्यांवर आता जितेंद्र आव्हाड यांनी छगन भुजबळांना उत्तर दिलं आहे.

छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला होता. आक्षणाच्या नावाखाली शरद पवार महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहेत असं छगन भुजबळ बारामतीत म्हणाले होते. (फोटो-X)

जितेंद्र आव्हाड यांचं उत्तर काय?

“महाराष्ट्राच्या राजकारणात जोपर्यंत शरद पवार यांचं नाव घेत नाही तोपर्यंत आपली काही किंमत राहणार नाही, हे महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या राजकारण्यांना माहीत आहे. त्यात छगन भुजबळ हे फार हुशार आहेत. सगळ्या उच्चवर्णीय समाजातून विरोध असताना शरद पवारांनी पहिल्यांता क्रांतिकारी निर्णय घेतला आणि मंडल आयोग सुरु केला हे मान्य आहे की नाही? ज्या शरद पवारांनी आयोग सुरु केले ते शरद पवार आम्हाला का अडवतील?” असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर गंभीर आरोप ,छगन भुजबळ यांनाही दिलं उत्तर (फोटो सौजन्य-जितेंद्र आव्हाड, फेसबुक पेज)

आम्हाला कधी सांगितलं बैठकीला चला?

“तुमच्या पक्षांत एकमेकांवर आरोप करणं सुरु आहे. छगन भुजबळांनीच कितीवेळा कोण काय करतं? ते सांगितलं. इतक्या वेळा बैठका झाल्या आम्हाला कधी सांगितलं बैठकीला चला? काय सुरु आहे याची चर्चा तरी केली का?” असेही प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केले आहेत.

विरोधी पक्षनेत्याला सरकारतर्फे फोन आला का?

“आम्हाला काही कोणाचा फोन वगैरे आला नाही. शरद पवारांना या सगळ्यापेक्षा महत्त्वाची कामे आहेत. तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला फोन केलात का? जयंत पाटलांना फोन केलात का? प्रतोद म्हणून मी आहे. पण तुम्ही वैयक्तिक फोन केलात. पण सरकारतर्फे फोन आला नाही. वैयक्तिक फोन करताना देखील तुम्ही जितेंद्र ओबीसींची बाजू आपल्याला लावून धरायची आहे, यासाठी केला होता. ओबीसी विरुद्ध मराठा हे झुंझवण्याची मला इच्छा नाही. मी हे पहिल्यापासून सांगितलं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.