महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीतही लोकसभेच्या जागावाटपावर चर्चासत्रं चालू आहेत. महायुतीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं निश्चित आहे. अशातच महायुतीत जागावाटपाबाबत दोन फॉर्म्युले तयार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. महायुतीचे ३७-८-३ आणि ३४-१०-४ असे दोन कथित फॉर्म्युले सध्या चर्चेत आहेत. पहिल्या कथित फॉर्म्युलानुसार भाजपाला ३७, शिंदे गटाला ८ आणि अजित पवार गटाला ३ जागा मिळतील. तर, दुसऱ्या फॉर्म्युलानुसार भाजपाला ३४, शिंदे गटाला १० आणि अजित पवार गटाला ४ जागा दिल्या जातील असं बोललं जात आहे. यावर कोणत्याही पक्षाने अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही. तर शिंदे गट आणि अजित पवार गटातील नेत्यांनी हे फॉर्म्युले फेटाळून लावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी या फॉर्म्युल्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एकनाथ शिंदे गटाइतक्याच जागा अजित पवार गटाला द्यायला हव्यात असं वक्तव्य केलं आहे. परंतु, भुजबळांची मागणी व्यक्तीगत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, ते तुमचे (प्रसारमाध्यमांचे) फॉर्म्युले आहेत. त्यावर मी काय बोलणार? तो आमचा फॉर्म्युला नाही. आम्ही एवढंच सागितलं आहे की, महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायला हव्यात. शेवटी तिन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील. त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांना मान्य असेल.

भुजबळांच्या मागणीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

दरम्यान, छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार म्हणाले, छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जितक्या जागा मिळतील तितक्या जागा त्यांच्या पक्षाला (अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) द्यायला हव्यात, ती त्यांची व्यक्तीगत मागणी आहे. त्यांच्या पक्षातील अजित पवार, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांच्यापैकी जे नेते पक्षाचं संघटनात्मक काम पाहतात ते आमच्या नेत्यांशी म्हणजेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर वरिष्ठांशी बोलतील आणि जागावाटपावर योग्य तोडगा काढतील.

हे ही वाचा >> “केसाने गळा कापू नका”, शिंदे गटाचा भाजपाला इशारा; म्हणाले, “आमचा विश्वासघात…”

भुजबळांचं मुनगंटीवारांना प्रत्युत्तर

दरम्यान, मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, माझं मत तेच आमच्या पक्षाचं मत आहे. ते काही माझं वैयक्तिक मत नाही. भुजबळ बोलतो तेव्हा पार्टी बोलते. त्यामुळे मुनगंटीवारांनी त्यावर बोलण्याचं कारण नाही. प्रसारमाध्यमांनी काहीतरी विचारल्यावर ते काहीतरी सांगणार… मुनगंटीवार यांनी सागितल्याप्रमाणे आम्ही जागा घेणार नाही. त्यांचे दिल्लीचे लोक आहेत…दिल्लीश्वर आणि इथल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून जागांचं योग्य वाटप होईल.