अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची तब्बल १०० कोटींची संपत्ती आयकर  विभागाने जप्त केली आहे, असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

छगन भुजबळ यांची १०० कोटींची बेहिशोबी मालमत्ता  जप्त झाली असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ व पंकज भुजबळ यांच्या या मालमत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. किरीट सोमय्या  यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Property worth 61 crore seized during elections period from backward Vidarbha
मागास विदर्भ निवडणूक काळात संपन्न, ६१ कोटींची मालमत्ता जप्त

”ठाकरे सरकारचे मंत्री छगन  भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळांच्या १०० कोटींच्या बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत.” असं ट्विट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.

”कोलकात्तामधील बोगस तेल कंपन्यांद्वारा हे मनी लॉण्ड्रींग करण्यात आलं होतं. अंजली दमानिया व मी वेगवेगळ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या, ईडी, एसईबी आणि आता आय़कर विभाग. याच्या अंतर्गत आय़कर विभागने जी प्रेसनोट काढली आहे. सत्र न्यायालयात दावा  दाखल झाला आहे, सात वर्षांपर्यंत पर्यंत शिक्षा होऊ शकते.” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

तर, हा संपत्तीशी माझा कोणताही संबध नाही असा खुलासा छगन भुजबळ यांच्याकडून या कारवाईच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला आहे.