Maharashtra Vidhan Sabha Exit Poll Updates: राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. मतदानानंतर २८८ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं. आता या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. मतदानानंतर आता निकालाकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं असून राज्यात कोणाचं सरकार येणार? याची उत्सुकता अनेकांना आहे. दरम्यान, आज मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार राज्यात भाजपा प्रणित महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तसेच काही एक्झिट पोल्सने महायुतीला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला असला तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर होण्याची शक्यताही काही काही एक्झिट पोल्सचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच एक्झिट पोल्सनुसार अपक्ष आणि इतर पक्ष महत्वाची ठरणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? हे सर्व आता निकालाच्या दिवशी म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. मात्र, आता समोर आलेल्या एक्झिट पोल्सनी अंदाजावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्रात १०० टक्के महायुतीचं सरकार स्थापन होईल’, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
#WATCH | On exit poll predictions, Maharashtra Minister and NCP candidate from Yeola, Chhagan Bhujbal says,"…In the last six months, the Mahayuti government brought a lot of schemes and implemented them…The fake narrative which was being spread by them was busted. A 100%… pic.twitter.com/UJabXWlTRB
— ANI (@ANI) November 20, 2024
छगन भुजबळ काय म्हणाले?
एक्झिट पोलच्या अंदाजांवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं की, “मी निवडणुकीच्या आधीच म्हटलं होतं की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील जनतेत मोठा बदल झालेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तापलं होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. मात्र, त्यानंतर पंतप्रधान मोदींची चर्चा केल्यानंतर त्यांनी कांद्यावरील निर्यातबंदी हटवली. त्यामुळे शेतकरी खूष झाले. त्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयांत विमा दिला. आमच्या सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना योजनेच्या माध्यमातून मदत केली. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीवेळी विरोधकांनी भाजपावर संविधान बदलणार असल्याचा प्रचार केला होता. पण लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलाव आला. हेच कारण आहे की एग्झिट पोलच्या अंदाजांवर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याचा अंदाज आहे. तसेच मला दखील पूर्ण विश्वास आहे की, महाराष्ट्रात १०० टक्के महायुतीचं सरकार स्थापन होईल”, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.