अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (१९ ऑगस्ट) ब्राह्मण समाजाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ब्राह्मण समाजातील लोक त्यांच्या मुलांची नावं संभाजी आणि शिवाजी अशी ठेवत नाहीत, असं वक्तव्य भुजबळ यांनी केलं. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर ब्राह्मण महासंघासह राजकीय पातळीवरून टीका होत आहे. या टीकेनंतर भुजबळ यांनी आज सकाळी (२० ऑगस्ट) प्रसारमाध्यमांशी बातचित केली आणि आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छगन भुजबळ म्हणाले, कुठल्याही समजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. महात्मा फुले यांना मुलींची शाळा काढण्यासाठी भिडे यांनी वाडा दिला आणि तिथे शाळा सुरू झाली. या कामात पुढे अण्णासाहेब कर्वे यांनी योगदान दिलं. ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना विरोध नाही. मी नक्कीच तसं म्हणालो. पूर्वी ब्राह्मणांच्या मुलींनासुद्धा शिक्षण मिळत नव्हतं ते सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांनी सुरू केलं. त्याचा जो काही ऐतिहासिक पुरावा असेल त्यावर चर्चा करता येईल.

छगन भुजबळ म्हणाले, मी देवांबद्दल मत मांडलं. परंतु, आमच्या घरात सगळे देव आहेत. एकाने मला विचारलं तुम्हाला लक्ष्मी चालते तर मग सरस्वती का नाही चालत? अरे आम्हाला सगळं चालतं. माझ्या घरात भवानी मातेची, सप्तश्रृंगी मातेची पूजा होते. खंडोबा, जोतिबा, म्हसोबा हे आमचे देव आहेत. आम्ही त्यांची पूजा करतो. आमच्या घरात प्रत्येकजण त्याला वाटेल त्या देवाची पूजा करतो.

ब्राह्मण समाजाबद्दल भुजबळ काय म्हणाले होते?

छगन भुजबळ म्हणाले होते की ब्राह्मण समाजाने वाईट वाटून घेऊ नये. पण, ब्राह्मण समाजात लोक त्यांच्या मुलांची संभाजी आणि शिवाजी अशी नावं ठेवत नाहीत.

हे ही वाचा >> दादा भुसे आणि आदित्य ठाकरेंची नाशकात गुप्त भेट? जयंत पाटील म्हणाले, “सगळीच माणसं आपल्या…”

सरस्वती आणि शारदा देवीबद्दल भुजबळ काय म्हणाले?

भुजबळ म्हणाले होते की कोणाला सरस्वती, तर कोणाला शारद आवडते. पण, आम्ही यांना पाहिलं नाही किंवा आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं नाही. ज्या महापुरुषांनी आम्हाला शिक्षण दिलं तेच आमचे देव. तेच तुमचेही देव असले पाहिजेत. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, रावसाहेब थोरात यांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली.