Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचे अन्न, नागरि पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यादरम्यान त्या ठिकाणी गेले होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्याहून मुंबईत आणण्यात आलं. मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्यावर उपचार सुरु आहेत.
छगन भुजबळ यांना काय झालं आहे?
छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना ताप आला आणि घशाचा संसर्ग झाला त्यामुळे त्यांना आज दुपारी पुण्यातून मुंबईत आणण्यात आलं. मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांची प्रकृती स्थिर आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं छगन भुजबळ यांच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केलं आहे. छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्याहून मुंबईत एअरलिफ्ट करुन आणण्यात आलं आहे. सध्या छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मिळते आहे.
एअरलिफ्ट करुन मुंबईत आणण्यात आलं
छगन भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा असल्याने त्यांच्यासह पुणे दौऱ्यावर गेले होते. आज सकाळपासूनच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना ताप आला आणि घशाचाही त्रास जाणवू लागला. पुण्यातील डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना पुण्यातून एअरलिफ्ट करुन मुंबईत आणण्यात आलं. बॉम्बे रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. छगन भुजबळ हे उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत आहेत असं सांगण्यात आलं आहे. याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये छगन भुजबळ यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याने मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
छगन भुजबळ आक्रमक नेते
महाराष्ठ्राच्या राजकारणातले आक्रमक आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून छगन भुजबळ यांचा लौकिक आहे. छगन भुजबळ हे सुरुवातीला शिवसेनेत होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. महाराष्ट्रात जेव्हा आघाडी सरकार होतं तेव्हा त्यांनी विविध पदंही भुषवली आहेत. जुलै २०२२ मध्ये अजित पवारांनी जे बंड केलं तेव्हा त्यांच्यासह ४१ आमदार गेले. त्यापैकी एक छगन भुजबळही आहेत. छगन भुजबळ हे महायुती सरकारमध्ये अन्न आणि नागरि पुरवठा मंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यासाठी ते पुण्याला गेले होते. मात्र आज सकाळपासूनच त्यांची प्रकृती बिघडली. ज्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करुन मुंबईत आणलं गेलं. छगन भुजबळ यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.