मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे महायुतीत येण्याची चिन्हं आहेत. मला बोलवलं म्हणून मी दिल्लीला आलो आहे आता पुढे काय होतं पाहू असं राज ठाकरे म्हणाले आहेत. मात्र राज ठाकरे महायुतीत येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे हे जर महायुतीत आले तर त्यांचं स्वागतच आहे असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी?

“शिवसेना आणि भाजपा या दोन्हींचा विचार हिंदुत्वाचा आहे. आमचा पक्ष त्यांच्या युतीत आहे. त्यांच्या पक्षात आम्ही आमचा पक्ष विलीन केलेला नाही. शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गावरच आम्ही चालतो आहोत. समाजातली चांगली प्रवृत्ती कोण? अपप्रवृत्ती कोण हे लोकांना समजतं. लोकांना या सगळ्याची जाणीव आहे. कोण काय भाष्य करतं याकडे लोक पाहात नाहीत, कोण आपली कामं करतो ते लोक पाहतात. आमचा म्हणजे महायुतीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार नक्की आहे. आम्ही महायुती म्हणून मोदींसाठी काम करतो आहोत. पण काम करताना भाषेवर ताबा ठेवला पाहिजे” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा- दिल्लीत उतरताच राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला….”

अजित पवारांच्या एकाच मंत्र्याने राजीनामा दिला होता. तो मंत्री मी होतो इतर कुठल्या मंत्र्यांनी मला राजीनामा दिलेला नाही. मी १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला होता. पण तो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नाही. मला तोच राजीनामा माहीत आहे असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे महायुतीत येणार का?

“राज ठाकरेंना जर बरोबर घ्यायचं असेल तर काही जागा सोडाव्या लागतील. महाविकास आघाडीतही वंचितची चर्चा सुरुच आहे. एकदा वरुन जागावाटप ठरलं की बाकी सगळ्या चर्चा थांबतात. राज ठाकरे आमच्या बरोबर आले तर स्वागत आहे. राज ठाकरे आल्याने महायुतीची शक्ती वाढेल. विधानसभेलाही, महापालिकेलाही हे नातं आणि संबंध उपयोगी पडतील. राज ठाकरे येत असतील तर चांगलीच गोष्ट आहे.” असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.