महाविकास आघाडीचं सरकार असतानाही भाजपाशी चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून फुटून भाजपाला साथ देण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचं भाजपासह जाण्याचं पत्र तयार होतं असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी छगन भुजबळ हे खोटं बोलत आहेत त्यांना महाविकास आघाडीची प्रक्रिया कशी झाली ते माहित नाही असं म्हटलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“छगन भुजबळ खोटं बोलत आहेत. महाराष्ट्रात २०१९ मध्ये जेव्हा महाविकास आघाडी स्थापन होण्याची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा भुजबळ तुरुंगातून नुकतेच सुटून आले होते. भुजबळांना तेव्हा काय घडलं ते माहित नव्हतं. भाजपाला बाजूला सारुन सरकार झालं पाहिजे ही भूमिका होती. मी त्या प्रक्रियेत होतो मला सगळ्या गोष्टी माहित आहेत. छगन भुजबळ हे आता काय म्हणत आहेत त्याला महत्व नाही. त्यांना मंत्रिपद हवं होतं, त्यांना ईडीपासून संरक्षण हवं होतं ते सगळं त्यांनी भाजपाबरोबर जाऊन घेतलं आहे. पण भुजबळांना सांगू इच्छितो फाईल कधीही बंद होत नाहीत. २०२४ ला नव्या प्रोटेक्शनसाठी भुजबळ कोणत्या पक्षात असतील ते बघावं लागेल.” असं म्हणत संजय राऊत यांनी भुजबळांचे दावे खोडले आहेत.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

हे पण वाचा- “पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड नव्हतं त्यांनी शब्द पाळला आणि शरद पवारांनी…”, छगन भुजबळांचं वक्तव्य

छगन भुजबळ यांनी काय म्हटलं होतं?

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी तयार होण्याआधी भाजपाबरोबर जायचं हे शरद पवारांनी ठरवलं होतं मात्र ऐनवेळेस त्यांनी माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन ते सांगून आले की मला तुमच्याबरोबर येता येणार नाही. त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी झाली तेव्हाही भाजपासह जायचं या चर्चा झाल्या होत्या. अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही मोदींना शब्द दिला होता की आपण सरकार स्थापन करु. या सगळ्या गोष्टींचा शब्द अजित पवारांनी पाळला पण शरद पवारांनी फिरवला. त्यामुळेच पहाटेचा शपथविधी हे अजित पवारांचं बंड नव्हतं, असंही भुजबळ म्हणाले होते. संजय राऊत यांनी छगन भुजबळांचा हा दावा खोडून काढला आहे.

सुप्रिया सुळे यांनी भुजबळांविषयी काय म्हटलं?

सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांचे दावे खोडून काढले आहेत. पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै २०२३ ला झालेला अजित पवारांचा शपथविधी याविषयी शरद पवारांना अंधारात ठेवण्यात आलं होतं असं स्वतः भुजबळ यांनीच मान्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्याला काय अर्थ आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Story img Loader