Laxman Hake In Support Of Chhagan Bhujbal : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनापूर्वी काल महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या नव्या मंत्रिमंडळात काल एकूण ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपाच्या २०, शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. अशात सर्वच पक्षातील मंत्रिपद न मिळालेले अनेकजण नाराज झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे (अजित पवार) छगन भुजबळ यांना या मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर त्यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. याचबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी ओबीसी मतांचा अपमान केल्याचे म्हणत अजित पवार भुजबळ यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करणार का हे सांगावे, असे म्हटले आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
navneet rana and balwant wankhede
Navneet Rana : “मी राजीनामा देतो, पण…”, नवनीत राणांना खासदार बळवंत वानखेडेंचं प्रतिआव्हान!
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar stake claim to form Mahayuti govt in Maharashtra
मुख्यमंत्री केवळ तांत्रिक व्यवस्था’ : तिघांनाही एकत्रित निर्णय घेण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

पुण्यात पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, छगन भुजबळ हे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यामागे काय कारणे होती. याची अजित पवारांनी उत्तरे द्यावीत. त्याचबरोबर अडीच वर्षांच्या मंत्रिपदाचा पायंडा पाडणारे अजित पवार अडीच वर्षांसाठी भुजबळांना उपमुख्यमंत्री करणार का? हे त्यांनी पुढे येऊन सांगावे.

एका बाजूला आनंद पण…

यावेळी लक्ष्मण हाके यांनी मंत्रिमंडळात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना स्थान मिळाल्याने ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला. पण दुसर्‍या बाजूला मागील कित्येक वर्षांपासून ओबीसी समाजाला न्याय मिळावा, यासाठी छगन भुजबळ हे कायम संघर्ष करीत राहिले असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.

राष्ट्रवादीकडून कोणाला संधी?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यावेळी धक्कातंत्र वापरत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. काल राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवळ, दत्ता मामा भरणे, मानिकराव कोकाटे, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली आहे. अशात आता राष्ट्रवादीचे नेतृत्त्व भुजबळ यांची समजूत कशी काढणार हे पाहावे लागणार आहे.

Story img Loader