Chhagan Bhujbal : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांना पत्र लिहलं आहे. मंत्रिमंडळातून वगळलं गेल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. नाशिक या ठिकाणी त्यांनी समता परिषदेचा मेळावा घेतला आणि आपली भूमिका मांडली. दरम्यान छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मला मंत्रिपदाची हाव नाही : छगन भुजबळ

“मी आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं. माझ्याविरोधात अर्वाच्य बोललं गेलं तेव्हा मी सांगितलं. प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही. कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”, असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

काय म्हटलं आहे छगन भुजबळ यांनी पत्रात?

लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी आपण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री मा. पीयूषजी गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

हे पण वाचा- Sharad Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना…”

कांद्याच्या भावाचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत

कांद्याच्या भावाचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडीत असून वेळोवेळी कांद्याच्या किमान निर्यात दरातील वाढीचा किंवा निर्यातबंदीचा जिल्ह्यातील कांदा निर्यातीवर विपरीत परिणाम होत आहे. आपल्या येवला मतदारसंघातील लासलगावमध्ये आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असून येथून मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होते. सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याचे उत्पादन संपले असून लाल कांद्याची बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे, मात्र कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीतया आहे. आधीच बिगरमोसमी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे त्रस्त असताना आता उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने तात्काळ विक्री करावी लागते, हेही नुकसानीचे महत्वाचे कारण आहे, असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.

कांद्यावरील २० टक्के उत्पादन शुल्क माफ केलंं जावं-छगन भुजबळ

शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणे गरजेचे असून राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी २० टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. तसेच श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले आहे.त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने माफ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आपण केली आहे. आपल्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळून लवकरच आपल्या बळीराजाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे, असंही छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी या पत्रात म्हटलं आहे.

:

छगन भुजबळ यांच्या पत्राला आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काही उत्तर दिलं जातं का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.