Chhanag Bhujbal Meets Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्याचं दिसून आलं. आधी मुख्यमंत्रीपद, मग मंत्रीपदांचं वाटप आणि नंतर खातेवाटप या गोष्टींवरून बरीच चर्चा घडून आली. त्यापाठोपाठ ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही, त्या नाराजांचीही चर्चा होऊ लागली. या नाराज नेत्यांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे छगन भुजबळ. भुजबळांनी ‘जहा नहीं चैना, वहां नहीं रेहना’ अशा आशयाचं विधान करून खळबळ उडवून दिली होती. त्याच भुजबळांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या भेटीत नेमकं काय घडलं? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

भेटीनंतर छगन भुजबळांचा माध्यमांशी संवाद

या भेटीनंतर छगन भुजबळांनी त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भेटीत नेमकं काय घडलं, याबाबत त्यांनी माहिती दिली. देवेंद्र फडणवीसांना आपण सगळं सांगितलं असून त्यांनी ८ ते १० दिवसांचा कालावधी मागितल्याचं ते म्हणाले. तसेच, ओबीसी समाज नाराज असल्याचं आपल्याला कळतंय आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण नक्की विचार करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं भुजबळ म्हणाले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

“मी आणि समीर भुजबळ आम्ही दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात सामाजिक, राजकीय विषयांचा समावेश आहे. काय घडलं, काय चालू आहे त्या सर्व बाबतीत चर्चा झाली. त्यांनी सांगितलं की माध्यमांमध्ये मी अनेक गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. त्यानंतर ते एवढंच म्हणाले की यावेळी महायुतीला मिळालेल्या विजयामध्ये ओबीसी समाजाचाही मोठा वाटा आहे. त्यासाठी आपण सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत. हे लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी मलाही आहे, असं ते म्हणाले. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं”, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

Chhagan Bhujbal : “मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना?”, छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा

देवेंद्र फडणवीसांनी वेळ मागून घेतलाय – छगन भुजबळ

सध्या सणामुळे मुलांना सुट्या आहेत, राज्यात वेगळं वातावरण आहे. त्यामुळे ते झाल्यावर या मुद्द्यावर चर्चा करून मार्ग काढण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं भुजबळ म्हणाले. “सध्या राज्यात सुट्या वगैरे यामुळे वेगळं वातावरण आहे. त्यामुळे मला ८ ते १० दिवस द्या. त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग यातून शोधून काढू. माझी आपल्याला विनंती आहे की ओबीसी नेत्यांना असं सांगा की मी त्यावर साधक-बाधक विचार करत आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं”, अशी माहिती छगन भुजबळांनी दिली.

“मी मुख्यमंत्र्यांना सगळं सांगितलंय. त्यांनी सगळा विषय समजून घेतला आहे. ओबीसी नाराज आहेत हे मला समजतंय. मी त्यावर नक्की विचार करेन, असंही ते मला म्हणाले”, असा उल्लेख छगन भुजबळांनी केला.

Story img Loader