Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचा काल (रविवार, १४ जुलै) बारामती येथे राज्यव्यापी जनसन्मान मेळावा पार पडला. पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या मेळाव्याला संबोधित करताना ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे नेते गैरहजर राहिले होते. शरद पवारांनी केलेल्या फोनमुळे मविआ नेते या बैठकीला आले नाहीत असा दावा भुजबळांनी यावेळी केला होता. दरम्यान, पवारांवर टीका करून एक दिवस उलटण्याआधीच भुजबळ शरद पवारांच्या घरी दाखल झाले. राज्यात चालू असलेल्या ओबीसी-मराठा वादावर पवारांनी तोडगा काढावा, अशी विनंती करण्यासाठी भुजबळ यांनी आज (१५ जुलै) शरद पवारांची मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

दरम्यान, या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. भुजबळांनी ही भेट कशासाठी घेतली याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. भुजबळ स्वगृही परतणार आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. अशातच भुजबळांसाठी परतीची दारं बंद असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
Dhananjay Munde
Dhananjay Munde : “पंकजाताईने मन मोठं केलं म्हणून…”, धनंजय मुंडेंचं परळीकरांसमोर वक्तव्य; म्हणाले, “मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी…”
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

भुजबळांसाठी परतीची दारं बंद : अनिल देशमुख

अनिल देशमुख म्हणाले, छगन भुजबळ यांनी परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना पक्ष परत घेणार नाही, ही आमची भूमिका आहे. एकीकडे बारामतीला जाऊन राजकीय वक्तव्य करायचं, शरद पवारांवर टीका करायची आणि इकडे (मुंबईत) येऊन शरद पवारांची भेट घ्यायची. पवारांना सांगायचं की राज्यात अतिशय स्फोटक परिस्थिती आहे, या परिस्थितीत तुम्हीच मार्ग काढू शकता, अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका चालणार नाही. भुजबळ हे दुटप्पी भूमिका घेऊन राजकारण करत आहेत. त्यांच्यासाठी पक्षाची परतीची दारं बंद आहेत.

Chhagan-Bhujbal Meet Sharad Pawar
छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली होती.

हे ही वाचा >> Chhagan Bhujbal : “महायुतीचं नुकसान होईल असं…”, भुजबळ-शरद पवार भेटीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया

दोघे पक्के पोहोचलेले नेते : जितेंद्र आव्हाड

दरम्यान या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले, काल छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर टीका केली म्हणून शरद पवार रुसून बसले नाहीत. भुजबळांनी भेटीसाठी वेळ मागताच पवारांनी अवघ्या एका मिनिटात त्यांना प्रवेश दिला, भेटीसाठी वेळ दिली. त्या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. ते दोन नेते काय चर्चा करतात, काय बोलतात हे जगाला सांगत नाहीत. दोघेही पक्के पोहोचलेले नेते आहेत.