Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचा काल (रविवार, १४ जुलै) बारामती येथे राज्यव्यापी जनसन्मान मेळावा पार पडला. पक्षाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या मेळाव्याला संबोधित करताना ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीका केली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे नेते गैरहजर राहिले होते. शरद पवारांनी केलेल्या फोनमुळे मविआ नेते या बैठकीला आले नाहीत असा दावा भुजबळांनी यावेळी केला होता. दरम्यान, पवारांवर टीका करून एक दिवस उलटण्याआधीच भुजबळ शरद पवारांच्या घरी दाखल झाले. राज्यात चालू असलेल्या ओबीसी-मराठा वादावर पवारांनी तोडगा काढावा, अशी विनंती करण्यासाठी भुजबळ यांनी आज (१५ जुलै) शरद पवारांची मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा