माझे शिक्षण पुणे विद्यापीठात झाले. त्या संस्थेला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ नाव देण्यासाठी छगन भुजबळ यांनी महत्वाची कामगिरी बजावली. सावित्रीबाई, महात्मा फुलेंचा विचार हाच महाराष्ट्र आणि देशाचा आहे. हेच विचार ऐक्यासाठी, आधुनिकतेसाठी उपयोगी पडेल, हे समजून छगन भुजबळांनी काम केलं, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या सत्काराचे गौरव समितीने आयोजन केलं होतं. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात या सोहळा संपन्न झाला. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूख अब्दुल्ला, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, लेखक-कवी जावेद अख्तर, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे यावेळी उपस्थित होत्या.

हेही वाचा – शरद पवारांसमोरच उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला जाहीर आव्हान, मंचावरुनच म्हणाले “हिंमत असेल तर एका…”

“सर्वांत उत्तर निवसस्थान महाराष्ट्र सदन”

शरद पवार म्हणाले, “दिल्लीत सगळ्या राज्य सरकारची निवासस्थान आहेच. तेथे सर्वांत उत्तम निवासस्थान असेल, तर ते ‘महाराष्ट्र सदन’ आहे. त्याचं काम छगन भुजबळांनी केलं. राज्य सरकारची गुंतवणूक न करता अतिशय उत्तम वास्तू त्यांनी उभी केली. नाशिकचा चेहरा बदलण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे,” असेही शरद पवार यांनी नमूद केलं.

Story img Loader