Chhagan Bhujbal : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता एक महिना झाला आहे. मात्र, महायुतीच्या काही नेत्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे अद्यापही काही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. त्यामुळे भुजबळांनी आपली नाराजी जाहीरपणे अनेकदा व्यक्त केली. एवढंच नाही तर अजित पवार यांच्याबाबतही नाराजी बोलून दाखवली होती. तसेच काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत नेमकं काय राजकीय चर्चा झाली? याबाबत अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली होती.

या भेटीनंतर छगन भुजबळ काही दिवस परदेश दौऱ्यावर गेले होते. आज ते परदेश दौऱ्यावरून पुन्हा आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी छगन भुजबळ यांना नाराजीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? तसेच फडणवीस यांनी तुम्हाला मंत्रि‍पदाचा शब्द दिला आहे का? याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी मला मंत्रिपदाबाबात कोणताही शब्द दिलेला नाही.”

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Sharad Pawar Ajit Pawar fb
Ajit Pawar : “शरद पवार राजकारणातून बाजूला झाल्यानंतर हा पठ्ठ्या…”, अजित पवारांचं सूचक वक्तव्य
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Sharad pawar Wrote a Message to Chhagan Bhujbal
Sharad Pawar : शरद पवारांनी लिहून दिलेला संदेश जेव्हा छगन भुजबळ वाचतात, पुण्यातल्या कार्यक्रमातल्या ‘त्या’ कृतीची राजकीय वर्तुळात चर्चा
Amruta Fadnavis on ladki Bahin Yojana
Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांची पोस्ट चर्चेत! “माझी लाडकी बहीण ही फक्त योजना नसून, आपल्या बहिणींच्या…”
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 : कमला हॅरीस यांचा पराभव, रात्रीचं भाषणही रद्द!
What Ajit Pawar Said About MVA and Balasaheb Thackeray?
Ajit Pawar : अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत, “बाळासाहेब ठाकरे हयात असते तर महाविकास आघाडी..”

हेही वाचा : PCMC Election : “महायुती, विधानसभा आणि लोकसभेसाठी”, भाजपा आमदाराने केली महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा

छगन भुजबळ काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ हे कुटुंबासह परदेशात गेले होते. आता ते परदेश दौऱ्यावरून नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना नाराजीसंदर्भात प्रश्न विचारला. परदेशात असताना तुमची राजकीय मनधरणी करण्यासाठी तुम्हाला कोणाचे फोन आले का? यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “मला कोणाचेही फोन आले नाहीत आणि आले तरी मी तुम्हाला सांगणार नाही. मात्र, मी पूर्णपणे थोडे दिवस राजकारणातून डोकं बाजूला काढलं होतं. आयुष्यभर राजकारण करतच आहे. त्यामुळे थोड्यावेळ डोक्याला राजकीय आराम द्यावा लागतो”, असं छगन भुजबळांनी म्हटलं.

फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का?

महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा झाली? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. तसेच या भेटीत फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. दरम्यान, या भेटीत फडणवीसांनी मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? यावर आता छगन भुजबळ यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस मला मंत्रिपदाबाबात काही बोलले नाहीत. फक्त ७ ते १० दिवस थांबा नंतर चर्चा करु एवढंच ते म्हणाले होते. मला मंत्री करणार किंवा आणखी काही जबाबदारी देणार असं काहीही बोललेले नाहीत. मी देखील तसं काही सांगितलं नाही”, असं भुजबळांनी स्पष्ट केलं.

Story img Loader