Chhagan Bhujbal on Sanjay Shirsat: विधानसभा निवडणुकीची प्रतिक्षा राजकीय पक्षांसह सर्व जनता करत आहे. महायुती की महाविकास आघाडी कोण बहुमत स्थापन करणार? यावर चर्चा झडत आहेत. तर काही जणांनी विधानसभा त्रिशंकू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र आलेले पाहायला मिळू शकतात. त्यांच्या विधानावर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी होकारार्थी प्रतिसाद दिला. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, त्याबरोबर आम्ही राहू, असे संजय शिरसाट यांनी जाहीर केले होते. त्यावर आता राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

संजय शिरसाट यांच्या विधानावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले, एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून काही दावा केल्यास त्यावर बोलता येईल. तीनही पक्षांचे प्रमुख नेते जे म्हणतात, तेच ब्रह्म वाक्य ठरते. बाकी नेते इकडे तिकडे जाण्याचे काही बोलत असतील तर त्यावर बोलणार नाही. पण ‘तिकडे’ही खूप अडथळे आहेत. तिकडे कुठे शरद पवार बसलेले आहेत तर कुठे उद्धव ठाकरे बसलेले आहेत. महायुती स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करेल.

Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
Bala Nandgaokar : बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : निकालाच्या आदल्या दिवशी उद्धव ठाकरेंचा भाजपाला धक्का, मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश,
Shivsena Thackeray vs SHinde in 49 constituencies
‘हे’ ५१ मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची, ठाकरे – शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी…”, संजय राऊतांचा गंभीर दावा; म्हणाले…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
eknath shinde devendra fadnavis (1)
महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्यांची मोर्चेबांधणी; भाजपाचाही पाठिंबा?

हे वाचा >> Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत..

येवला विधानसभा मतदारसंघात माझा विजय होणार आहे. येवल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी थोडी वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पण येवल्यात पूर्वी काय होते? आता काय झाले, याची माहिती असणाऱ्या मराठा समाजासहीत सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी मला मतदान केले. ६० हजाराहून अधिक मताधिक्यांनी मी निवडून येईल, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

त्रिशंकू विधानसभा होणार नाही?

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोल्स समोर आले आहेत. यापैकी काहींनी त्रिशंकू विधानसभा होणार असल्याचे सांगितले आहे. यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अनेक एक्झिट पोल्सनी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगितले आहे. आजही एक रिपोर्ट आलेला आहे, उत्तर महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर निवडून येणार आहेत.

संजय शिरसाट काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले नाही आणि त्यांना दुय्यम भूमिका निभावावी लागली तर काय करणार? असा प्रश्न शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना टिव्ही ९ या वृत्तवाहिनीने विचारला. यावर ते म्हणाले, यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील. निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्याबरोबर गेले तर? असा प्रश्न विचारला असताना संजय शिरसाट म्हणाले की, शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्याबरोबरच जाऊ.