काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेलं विधान आणि ‘सामना’तील अग्रलेखातून ठाकरे गटाने शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर महविकास आघाडीत मतभेद वाढत आहेत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यासंदर्भात विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही भाष्य केलं असून महाविकास आघाडीत कुणीही मिठाचा खडा टाकण्याच्या प्रयत्न करू नये, असं ते म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “ते काहीही बोलू शकतात, त्यांचं वैशिष्ट्य..”, शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका; म्हणाले…!

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
uddhav Thackeray sawantwadi
“कोकण आणि शिवसेनेचे नाते तोडण्याचा प्रयत्न, कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही”, उद्धव ठाकरेंचा इशारा
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

“महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होईल, अशी विधानं कुणीही करू नये. प्रत्येक नेत्याने याची काळजी घ्यायला हवी. जोपर्यंत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार एकत्र आहेत. तोपर्यंत कोणी काहीही बोललं तरी त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. तसेच “खरं तर खालच्या पातळीवरच्या नेत्यांना महाविकास आघाडीसाठी बरोबरीने काम करायचं आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. महाविकास आघाडीत कुणीही मिठाचा खडा टाकण्याच्या प्रयत्न करू नये”, असेही ते म्हणाले.

शरद पवारांनी लगावला टोला

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला. “चव्हाण यांनी त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे. ते बघावं. ते ए आहेत, की बी आहेत की सी आहेत की डी आहे ते आधी तपासावं. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की यांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील. मात्र, जाहीरपणे सांगणार नाहीत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – शरद पवार म्हणतात, “आम्ही काय केलंय, हे त्यांना माहिती नाही”, वारसदार तयार करण्याच्या टीकेवर ठाकरे गटाला सूचक प्रत्युत्तर!

पृथ्वाराज चव्हाण नेमकं काय म्हणाले होते?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर त्यावरून प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देताना “राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचा ‘प्लॅन बी’ सुरू आहे,” असा दावा केला होता. त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं.