Chhagan Bhujbal on Ajit Pawar Nashik Visit : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार हे आज (२ ऑगस्ट) नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. नाशिक हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांचा गड मानला जातो. अजित पवार, त्यांच्या पक्षातील कोणतेही वरिष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री नाशिक दौऱ्यावर गेले तर छगन भुजबळ हे या नेत्यांबरोबर असतात. मात्र आज अजित पवार नाशिक दौऱ्यावर असून छगन भुजबळ हे त्यांच्याबरोबर उपस्थित नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. त्यावरून छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मतभेद असल्याची चर्चा चालू असतानाच अजित पवार व छगन भुजबळ नाशकात एकत्र नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावर भुजबळ यांनी स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “गेले १५ दिवस मी मतदारसंघात नव्हतो. मला आता माझ्या मतदारसंघात जायचं आहे. तसेच येत्या १० ऑगस्ट रोजी अजित पवार पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा ते माझ्या मतदारसंघातही येतील. तेव्हा मी त्यांच्याबरोबर असेन. सध्या प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आहे. एकाच वेळी सर्व नेते एकाच ठिकाणी जाऊ शकतील असं होणार नाही. त्याचबरोबर माझी तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. काल मी खूप त्रासदायक प्रवास केला आहे. त्यामुळे मी आज अजित पवारांबरोबर नसेन. याबाबत माझी अजित पवारांबरोबर चर्चा झाली आहे. ते मला म्हणाले, १० तारखेला आपण एकत्र तुमच्या मतदारसंघात जाऊ. कारण एकाच वेळी, एकाच ठिकाणी सर्व आमदार एकत्र जाऊ शकत नाहीत.”

manoj jarange patil criticized devendra fadnavis
“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही”, आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा; म्हणाले…
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Maratha reservation high court
मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण, आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकार आता भूमिका मांडणार
Akola connection in murder case of Baba Siddiqui leader of NCP Ajit Pawar group
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे अकोला ‘कनेक्शन’? जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोस्टमुळे…
Raj thackeray on Baba Siddique
Raj Thackeray : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “बाहेरच्या राज्यातून…”
Baba Siddique firing, What Doctor Jalil Parkar Said?
Baba Siddique : “बाबा सिद्दीकींना छातीवर दोन गोळ्या लागल्या, ज्या…” ; डॉ. जलील पारकर यांची महत्त्वाची माहिती
Narhari Zirwal Answer to Raj Thackeray
Narhari Zirwal : नरहरी झिरवाळांचं राज ठाकरेंना उत्तर, “मी आदिवासी आहे जाळी नसली तरीही…”
rohit pawar criticized devendra fadnavis
Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!

हे ही वाचा >> Devendra Fadnavis: दिल्लीच्या राजकारणात जाणार की महाराष्ट्रात? देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर म्हणाले, “मी…”

मनोज जरांगे पाटलांबाबत काय म्हणाले?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणाले, “विधानसभा निवडणुकीमुळे पुढील एका महिन्याभरात राज्यात आचारसंहिता लागली तर मतदारसंघात चालू असलेली कामं बाजूला पडतील. तसेच विधानसभा निवडणुकीची तयारी करायची आहे.” दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याबाबत भाष्य केलं होतं. त्यावर भुजबळ म्हणाले, “तुम्ही प्रसारमाध्यमं माझ्या मतदारसंघाबाबत तसेच इतर काही बातम्या छापत असता, दाखवत असता, मी त्या पाहत असतो आणि त्याची थोडी मजा घेत असतो. मला असं वाटतं लोकशाहीत सर्वांनी उभं राहायला हवं.”