आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली, असं धक्कादायक विधान मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केलं होतं. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी उद्विग्न अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“जरांगे-पाटलांचं मत योग्य आहे. आमची लायकी नाही. आम्ही मराठ्यांच्या हात करावे. पण, मराठ्यांनी आमच्या हाताखाली काम करणे योग्य नाही,” अशी खोचक टिप्पणी भुजबळांनी व्यक्त केली आहे. ते ‘लोकशाही’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
The Karanja Sub Bazar Committees board was dismissed and an administrator appointed
महायुती एक्टिव मोडवर! बाजार समिती बरखास्त करीत खासदार गटास दिला झटका.

हेही वाचा : सुषमा अंधारेंनी जरांगे-पाटलांना ‘त्या’ भूमिकांवरून खडसावलं; भाजपावर आरोप करत म्हणाल्या…

छगन भुजबळ म्हणाले, “जरांगे-पाटलांचं मत योग्य आहे. माझी लायकी काय? मी तर माळी आहे. माझ्या हाताखाली काम करणारा मराठा माझ्यापेक्षा जातीनं मोठा आहे. दलित पोलीस अधीक्षक होतो. त्याच्या हाताखाली उपअधीक्षक मराठा असतो. अधीक्षकांनी काम करूच नये. कारण, त्यांची लायकी नाही. हे नवीन चातुर्वर्ण तयार झालं आहे.”
“आमची लायकी नाही. आम्ही मराठ्यांच्या हाताखाली काम करायचे. पण, मराठ्यांनी आमच्या हाताखाली काम करणे, मलाही पटत नाही,” असं छगन भुजबळांनी म्हटलं.

हेही वाचा : “मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपेक्षा एक..”, काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

जरांगे-पाटील नेमकं काय म्हणाले?

“मराठा समाजातील मुलांना ९५ टक्के पडूनही नोकरी लागत नाही. आमची मुले हुशार असतानाही, आरक्षणात बसत असूनही आरक्षण नसल्याने लाखो मुले सुशिक्षित बेरोजगार राहिले. हेच आरक्षण ७० वर्षांपूर्वी मिळाले असते, तर सनदी अधिकारी बनणाऱ्या मराठा मुलांना खालच्या पदावर समाधान मानावे लागले नसते. नोकरीतील टक्का कमी झाला, परिणामी हुशार असतानाही लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ आली,” असं जरांगे-पाटलांनी म्हटलं होतं.

Story img Loader