जालन्यातील अंबड येथे ‘ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा’ पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. याचे पडसाद राज्यभरात उमटले. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी छगन भुजबळांना लक्ष्य करत मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी सरकारकडे केली होती. याला छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला आमदारकी आणि मंत्रीपदाची काळजी नाही, असं भुजबळांनी म्हटलं आहे. ते इगतपुरी येथे सभेला संबोधित करत होते.

संभाजीराजे छत्रपती काय म्हणाले होते?

“छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का? हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी,” असं संभाजीराजे छत्रपतींनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर म्हटलं होतं.

Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
maharashtra assembly election 2024 rohit pawar s reply to mahesh landge in bhosari assembly constituency
पिंपरी : धमक्या देऊ नका, आम्ही राजकारणात गोट्या खेळण्यास आलो नाहीत; रोहित पवार यांचे महेश लांडगे यांना प्रत्युत्तर
Uddhav Thackeray Balapur, Uddhav Thackeray Criticize BJP, Balapur,
‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

हेही वाचा : “तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही”, भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर देत जरांगे-पाटील म्हणाले…

“तुम्ही कुठल्याही एका समाजाचे नाहीत”

यावर छगन भुजबळ म्हणाले, “मी संभाजीराजे छत्रपती यांचा सन्मान करतो. कारण, आमच्या हृदयात मागासवर्गीयांसाठी लढणारे राजर्षी शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही बसले आहात. तुम्ही कुठल्याही एका समाजाचे नाहीत, तर सर्वांचे आहात. मग, तुम्ही एका समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलू शकता?”

हेही वाचा : “मराठा समाजाची वाताहत कुणी केली?” भुजबळांसमोर पडळकरांचा शरद पवारांवर हल्लाबोल; म्हणाले, “पुतण्याला…”

“मला आमदारकी आणि मंत्रीपदाची काळजी नाही”

आरक्षणाच्या प्रकरणात संभाजीराजेंनी पडायला नको होतं. ‘सर्वांचे अधिकार शाबूत ठेवून कुणावरही अन्याय करू नये,’ असं मत संभाजीराजेंनी मांडायला हवं होतं. बीडमधील घरेदारे मी जाळली का? तेव्हा तर तुम्ही गप्प होता. बीडमधील झालेलं नुकसानीची पाहणी करण्यासाठी तुम्ही जायला हवं होतं. मला आमदारकी आणि मंत्रीपदाची काळजी नाही,” असे भुजबळांनी सांगितलं.

“तुम्ही राज्याचे महाराज आहात. त्यामुळे सगळ्यांना न्याय द्या. अन्याय होणार नाही, याची काळजी घ्या,” असं आवाहन भुजबळांनी संभाजीराजे छत्रपतींना केलं आहे.