कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना सरकाकडून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे. या मराठा कुटुंबांचा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेश होणार आहे. त्याला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मराठा आंदोलनादरम्यान, बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, बीडमधली दंगल ही भुजबळांनीच घडवून आणली होती. त्यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी जरांगे पाटलांच्या आरोपांना उत्तर दिलं. भुजबळ म्हणाले, हे अत्यंत बालिश असे आरोप आहेत. मी बीडला जाऊन इतकी मोठी दंगल करू शकतो का? मुळात मी असं करण्यामागचं कारण काय? तसेच या दंगलप्रकरणी पकडली गेलेली पिस्तुलधारी माणसं मनोज जरांगे यांची आहेत. २४ तास जरांगेंबरोबर राहणारी माणसं बीडच्या जाळपोळप्रकरणी पोलिसांनी पकडली आहेत.

Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तर माझ्या बरोबर कुणीही काम केलं नसतं”, अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं
Sanjay Shirsat On Mahayuti Cabinet Politics :
Sanjay Shirsat : मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “मंत्रिपदे देताना…”
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”
There should be no political interference in municipal programs says MLA Sneha Dubey Pandit in vasai
आमदार स्नेहा दुबे पंडित यांचा बविआला पहिला धक्का; “कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप नको”, पालिका अधिकार्‍यांना ताकीद
Deepak Kesarkar eknath shinde devendra fadnavis
मुख्यमंत्रीपद की गृहमंत्रीपद, शिवसेनेची नेमकी मागणी काय? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

छगन भुजबळ म्हणाले, बीडच्या घटनेशी माझा संबंध काय? गेली कित्येक वर्षे मी बीडला गेलो नसेन…आणि तिथे जाऊन मी काय करणार? माझ्याच लोकांची घरं जाळणार का? मी एवढा अमानुष नाही. ज्या पद्धतीने त्यांनी ते सगळं केलंय, मी तेवढा अमानुष नाही. मी ५७ वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांना मी गेलो आहे. प्रसंगी मी माझा जीव धोक्यात घालून आंदोलन केलं आहे. परंतु, मी कोणालाही दगड मारला नाही. असा कुठलाही अहवाल माझ्याविरोधात नाही.

हे ही वाचा >> “छगन भुजबळ स्वतःवरचे खटले रद्द करून घेण्यासाठी…”, मनोज जरांगे पाटलांचा आरोप

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणाले, तुम्ही मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या माणसांचा तपास करा, त्यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळी शस्त्रं आणि पिस्तुलं सापडतील. त्या माणसांवर किती खटले आहेत तेसुद्धा पाहा. त्यात कितीतरी वाळूमाफिया आहेत, काळे धंदे करणारे लोकही आहेत.

Story img Loader