राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मुंबईचे महापौर ते उपमुख्यमंत्री अशी पदं भूषवली. त्यांनी सत्तेत असताना अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. मात्र छगन भुजबळ यांच्या या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना मुंबईच्या महापौरपदाची कारकीर्द जास्त आवडते. त्याची काही कारणंही त्यांनी सांगितली आहेत. छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीवर त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘काय झाडी, काय हाटेल’ म्हणणाऱ्या शहाजीबापूंवर ‘काय ते ट्रॅफिक’ म्हणण्याची वेळ; तासभर अडकले वाहतूक कोंडीत

मी मुंबईचा महापौर झालो होतो. त्याची आठवण मला सातत्याने येते. मी त्यावेळी अतिशय लोकप्रिय महापौर होतो. तेव्हा मी ‘सुंदर मुंबई, मराठी मुंबई’ ही घोषणा देऊन कामाला लागलो. बॉम्बेचं मुंबई हे नाव करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया येथे मोठी सभा झाली. या सभेसाठी बाळासाहेब ठाकरे हेदेखील उपस्थित होते. या सभेला सर्व धर्माचे लोक, नेते उपस्थित होते. मुंबईत आम्ही ट्रॅफिक अलर्टची सुरुवात केली होती. तेव्हा आम्ही मुंबई विकायला निघालो आहोत, असे काही वर्तमानपत्रांनी लिहिले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा >>> राज्यातील माजी मंत्री हाती बांधणार शिवबंधन! शिंदे गटातील मंत्र्याला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मास्टरस्ट्रोक

मला महापौर हे आवडीचे पद मिळाले होते. या पदाने मला मान, सन्मान दिला. माझ्याकडे तेव्हा लाल दिव्याची, लाल रंगाची एक गाडी होती. मी या गाडीत असलो की लोक मला भुजबळ साहेब चालले असे म्हणायचे. लोक मला विसरत नव्हते. मी त्या गाडीत पूर्ण महाराष्ट्र फिरलो. यातूनच शिवसेना वाढत गेली. लोकांना वाटायचं हा आपल्यातला माणूस आहे. अशीच एकदा काँग्रेस स्थापनेची शताब्दी होती. तेव्हा राजीव गांधी मुंबईत येणार होते. तुम्ही मुंबईत येणार आमचे पाणी घेणार. कचरा करणार. मग या शहराला तुम्ही काय देणार? असे मी त्यांना विचारले होते. त्यानंतर राजीव गांधी यांनी मुंबईसाठी १०० कोटी रुपये दिले होते. याच पैशातून नंतर धारावीमध्ये पहिल्यांदा इमारती उभ्या राहिल्या, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली.

हेही वाचा >>> अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यावर ठाकरे गटाचे गंभीर आरोप

पुढे बोलताना भुजबळ यांनी त्यांच्या ६० व्या वाढदीवशाची आठवण सांगितली. साठाव्या वर्षीचा वाढदिवस शिवाजी पार्कवर झाला. त्यावेली विलासराव देशमुख, शरद पवार, लालूप्रसाद यादव यांच्यापासून देशातील अनेक नेते हजर होते. पूर्ण शिवाजी पार्क, शिवाजी पार्कजवळचे रस्ते लोकांनी फुलून गेले होते. बिहारपासून रेल्वेगाड्या आल्या होत्या. शिवाजी पार्कवर वाढदिवसाची सभा कदाचित छगन भुजबळ यांचीच झाली असेल, असेही यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal said mumbai mayor post is still favorite for me prd