Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०२३ मध्ये थेट पडली. कारण अजित पवार हे ४१ आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यानंतर महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभा दावा निर्माण झाला. कारण अजित पवार यांनी थेट शरद पवारांविरोधातच दंड थोपटले. हे दोघं एकत्र येतील का? असा प्रश्न छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना विचारला असता त्यांनी यावर उत्तर दिलं आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात फूट
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात उभी फूट पडली आहे. २०२३ मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या वयावरुन त्यांच्यावर टीका करत आता शरद पवार यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत गेलं पाहिजे असं म्हटलं होतं. तसंच लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असाही सामना रंगला. जो शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होता. त्यात सुप्रिया सुळेंचा विजय झाला. तर विधानसभेला अजित पवारांनी बारामती तर जिंकलीच शिवाय ४० हून अधिक आमदारही निवडून आणले. यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र आलं पाहिजे अशा चर्चा होत आहेत. याबाबत छगन भुजबळ यांना विचारलं असता छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी उत्तर दिलं आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
मी आता पंचांग वगैरे पाहतो, इथे चांगले ज्योतिषी आहेत म्हणतात त्यांना विचारतो. मला तर काही माहीत नाही असं उत्तर छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी दिलं आहे. तसंच प्रतापराव चिखलीकर यांनी म्हटलं आहे की आमचा पक्ष क्रमांक एकला जाईल ही चांगलीच बाब आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर काय चर्चा रंगल्या आहेत?
विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? या चर्चा रंगल्या आहेत. कारण अजित पवारांच्या मातोश्रींनी तशी इच्छा बोलून दाखवली होती. तसंच युगेंद्र पवार यांच्याही आईने यासंदर्भातली इच्छा बोलून दाखवली होती. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्यात पार पडली आणि निकालही त्याच महिन्यात लागला. ज्यानंतर १२ डिसेंबरला म्हणजेच शरद पवार यांच्या वाढदिवशी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह शरद पवारांना भेटले होते. तेव्हापासूनच हे दोघं एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र या दोघांनी याबाबत काहीही भाष्य केलेलं नाही. तर छगन भुजबळ यांनी पंचाग पाहतो असं म्हणत त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.