राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी आपल्याला राजकारणात खोटं बोलता येत नाही असं म्हटलं. तसेच आतापर्यंत केवळ दोनदा खोटं बोलल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी खोटं बोलण्याचे हे दोन प्रसंगही सांगितले. यात एक प्रसंग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचा आहे, तर दुसरा शरद पवार यांच्याशी संबंधित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छगन भुजबळ म्हणाले, “मी खोटं बोलणार नाही. मी खोटं बोललो, पण केवळ दोन वेळा खोटं बोललो. मला राजकारणात खोटं बोलता येत नाही. एकदा जेव्हा मला शिवसेनेतून बाहेर पडायचं होतं. बाहेर पडण्याच्या एक दिवस आधी एका वर्तमानपत्रात हे वृत्त आलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंचा फोन आला. तेव्हा मी बाळासाहेबांशी खोटं बोललो की, नाही नाही, असं काही होणार नाही.”

“शरद पवारांचा फोन आला होता तेव्हा दुसऱ्यांदा खोटं बोललो”

“मी दुसऱ्यांदा तेव्हा खोटं बोललो जेव्हा शरद पवारांचा फोन आला. त्यांनी मला तिकडे काय चाललं आहे असं विचारलं. त्यावेळी मी खोटं बोललो की, मी पाहून येतो. ते दोन्ही खोटं मी आज कबुल केलं आहे. बाकी मी जे बोललो ते १०० टक्के सत्य आहे,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

हेही वाचा : “…त्याशिवाय अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत”, छगन भुजबळांचं नाशिकमध्ये वक्तव्य, म्हणाले…

“होय, मी त्यादिवशी पवार आणि सुप्रिया सुळेंशी खोटं बोललो”

दरम्यान, छगन भुजबळ म्हणाले होते, “तिकडे काय झालंय हे पाहून येतो असं सांगून छगन भुजबळ गेले आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली”, असं शरद पवार म्हणाले होते. याबाबत छगन भुजबळांना विचारलं असता ते म्हणाले की, “साहेब म्हणतात ते खरं आहे. त्या दिवशी ठरलं की तिथे जमायचं. त्यानुसार, अजितदादांच्या घरी जमायला सुरुवात झाली. मला पहिल्यांदा सुप्रियाताईंचा फोन आला, मी त्यांच्याशी खोटं बोललो. मी मुलांबरोबर लोणावळ्याला आलो आहे, पाऊस खूप आहे, असं त्यांना सांगितलं. अजित दादांना प्रांताध्यक्ष करण्यासाठी सगळे जमले आहेत, असा सगळ्यांचा असा भ्रम झाला. पण कशासाठी जमले आहेत, कोणालाही माहित नव्हतं. फक्त आम्हाला माहीत होतं. एक दीड महिना चर्चा होऊन सुद्धा कोणालाही माहीत नव्हतं.”

“सुप्रिया ताईंना मी म्हणालो की मी जाऊन पाहतो. सुप्रिया ताई म्हणाल्या तुम्ही नका येऊ. पाच मिनिटांनी लगेच साहेबांचा फोन आला. जे सुप्रिया ताईंना सांगितलं तेच साहेबांना सांगितलं. अध्यक्ष पदाचं नंतर ठरवायचं आहे ना मग आता कशाला गोळा झाले आहेत? असं पवारांनी मला विचारं. मी म्हटंल मी जाऊन बघतो. मी तेव्हा घरीच होतो, पण लोणावळ्यात आहे असं सांगितलं”, असं भुजबळ म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal say speak lie two times in entire political career pbs
Show comments