हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राला रामराम ठोकून दिल्लीत जाण्याचे संकेत देणारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्या भूमिकेवरून घुमजाव केले. ‘आपण ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, तेथील लोकसभेचा मतदारसंघ राखीव आहे. मग आपण कुठून निवडणूक लढविणार,’ असे सांगत त्यांनी दिल्लीत जाण्याच्या विधानावरून कोलांटउडी घेतली.
पक्षाच्या म्हणण्यानुसार आपली लोकसभेत जाण्याची तयारी आहे. मंडल आयोगाचा संदर्भ देत पक्षश्रेष्ठींचा निर्णय अनेकदा आपण मान्य करत नाही, असे पत्रकारांनी छेडले असता ते बंड आपले वैयक्तिक नव्हते. आठ ते साडे आठ कोटी जनतेचा तो विषय होता. त्यामुळे लोक भावनेचा विचार करून आपण तेव्हा भूमिका घेतली होती, असे भुजबळ यांनी नमूद केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in