महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा प्रयोग आजही चर्चिला जातो. त्याचे विविध पैलू देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार यांच्याकडून बाहेर आले आहेतच. अशातच शरद पवारांनी शब्द फिरवला, भाजपाला डिच केलं. अजित पवारांनी ते बंड केलं नव्हतं तर त्यांनी भाजपाला दिलेला शब्द पाळला होता. शरद पवारांनीही भाजपासह जाण्याचं नक्की केलं होतं पण शब्द पाळला नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता याबाबत शरद पवार काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

“२०१९ च्या पहाटेच्या शपथवविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी जे म्हटलं की शरद पवारांनी विश्वासघात केला ते योग्यच आहे. मी शरद पवार यांना गुरु मानतो त्यामुळे मी असं म्हणणार नाही. पण त्यांनी भाजपाला २०१९ मध्ये डिच केलं. शरद पवारांनी शब्द दिला होता म्हणून शिवसेनेची साथ सोडली. शरद पवार आणि अजित पवार यांची चर्चा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी झाली होती. मात्र नंतर जाऊन शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगितलं होतं की मला भाजपाबरोबर जाता येणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की विश्वासघात केला. ते तसं म्हणू शकतात. मी हे म्हणतोय की शरद पवारांनी भाजपाला डिच केलं.”

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर

अजित पवारांनी जे केलं त्याला बंड म्हणताच येणार नाही

अजित पवारांनी २०१९ मध्ये पहाटेचा जो शपथविधी केला ते काही बंड नव्हतं. त्यांनी भाजपाला दिलेला शब्द पाळला. शरद पवारांनी तो शब्द फिरवला. आम्ही त्यांच्या बरोबर गेलेले जे आमदार होते त्यांनाही परत आणलं. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची संमती नव्हती. पण त्या दरम्यान घडलं असं की शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरु झाल्या. त्यावेळी नेहरु सेंटरमध्ये शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थोडे वाद झाले. शरद पवार त्यावेळी रागाने बाहेर पडले. ती संधी साधून अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांशी संपर्क केला. रात्रीतून राष्ट्रपती राजवट उठवली गेली. शरद पवार आणि अजित पवार यांनी भाजपाला जो शब्द दिला होता तो शब्द अजित पवारांनी पाळला, शरद पवार फिरले. त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळला त्यामुळे २०१९ ला जो पहाटेचा शपथविधी झाला त्याला बंड म्हणताच येणार नाही. असं छगन भुजबळ यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या होत्या

अजित पवार, शरद पवार यांनी भाजपाबरोबर संधान साधलं होतं. भाजपा आणि राष्ट्रवादीचं सरकार येईल हे २०१९ मध्ये ठरलं होतं. २०१९ ला शिवसेना आणि भाजपा यांच्यात अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदावरुन भांडण झालं आणि त्यांचं फाटलं होतं. त्याआधीच सरकार बनवायचं ठरलं होतं. मात्र ऐनवेळी शरद पवारांनी माघारा घेतली. त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं होतं की मी शब्द दिला होता पण मला शक्य नाही. मग ते उद्धव ठाकरेंबरोबर गेले पुढे काय झालं माहित आहेच. अजित पवार यांनी शब्द पाळला.

२०१९ मध्ये अजित पवार का परत आले?

भाजपाबरोबर गेलेले अजित पवार परत का आले? ते विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “कोर्टाने हात दाखवून मतदान करायला सांगितलं. गुप्त मतदान झालं असतं तर अजित पवार आणि फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. तसंच अजित पवारांबरोबर जे आमदार गेले होते ते परत आले. त्यांना प्रतिभा पवार म्हणजेच शरद पवार यांच्या पत्नी अजित पवारांना भेटल्या. त्यांनीही अजित पवारांना परत येण्याची विनंती केली. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद सोडलं. कोर्टाचा निर्णय, प्रतिभा पवारांचा शब्द यामुळे अजित पवार परतले.”

Story img Loader