मी मनोज जरांगेंना १५ दिवसांनी उत्तर दिलं तरीही लगेच आरोप केले जातात छगन भुजबळांमुळे अशांतता वाढते आहे. मी मनोज जरांगेंन १५ दिवसांनी उत्तर देतो कारण सौ सुनार की एक लोहार की! अशांतता कोण निर्माण करतं आहे त्याचा विचार सगळ्यांनी करायला हवा.
असं इंदापूरमधून छगन भुजबळ म्हणाले आहेत. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जे उत्तर दिलं ते वाचून दाखवत बीडमध्ये पोलिसांना मारहाण झाली हेदेखील छगन भुजबळांनी वाचून दाखवलं. हे सत्य वेळीच समोर आलं असतं तर मनोज जरांगे पाटील यांना सहानुभूती मिळालीच नसती असंही ते म्हणाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात कायदा सुव्यस्था आहे की नाही?

“राहत्याला पिंपरीत दोन दलित कुटुंबं आहेत त्यांनी कुणीतरी घोरपडे म्हणून आहेत त्यांना मतदान केलं नाही म्हणून त्यांचं घर उद्ध्वस्त केलं. ५०० लोक चाल करुन आले होते. यामध्ये कालपर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती. मगाशी डॉ. यादव म्हणून भेटले त्यांच्या रुग्णालयाची तोडफोड झाली. हे काय चाललं आहे? राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही? ते सांभाळण्याची जबाबदारी कुणाची?” असे प्रश्नही भुजबळ यांनी उपस्थित केले. बीडमध्ये महिला पोलिसांवरही हल्ला झाला. कुणीही बोलायला तयार नाही. बीडमध्ये घरं जाळली गेली.

देवेंद्र फडणवीस यांचं उत्तरच छगन भुजबळ यांनी वाचलं

“शुक्रवारी विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं. त्यांनी उत्तरात काय म्हटलं आहे? जमाव हिंसक झाला आणि ७९ पोलीस जखमी झाले. त्यानंतर लाठीचार्ज झाला. ही बाजू तेव्हाच पुढे यायला हवी होती तसं झालं असतं तर त्याला (मनोज जरांगे पाटील) एवढी सहानुभूती मिळाली नसती.” छगन भुजबळ म्हणाले, “मला हे समजत नाही की हे सगळे का समोर आणलं नाही? मी दोन महिन्यांपासून हे सांगत होतो की पोलिसांना मारहाण झाली आहे. तरीही कुणीही काहीही बोललं नाही. माझ्यावर टीका करताना तो (मनोज जरांगे पाटील) काहीही बोलतो. तरीही मी उत्तर दिल्यानंतर सांगितलं जातं अशांतता पसरते आहे.”

मी तलवारींची आणि धमक्यांची भाषा करत नाही

“मी काय तलवारींची भाषा केली आहे का? ती भाषा त्याने केली. २४ तारखेनंतर तुला दाखवतो, तुझा हिशेब करतो हे कोण बोललं? आमचा विरोध मराठ्यांना नाही. आमचा विरोध झुंडशाहीला आहे. दादागिरी केली तर दादागिरीनेच उत्तर देऊ. त्यानंतर आमच्यावर जबाबदारी टाकू नका असंही भुजबळ म्हणाले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये एवढीच मागणी आम्ही करतो आहोत. त्यात काय चुकीचं आहे? असाही प्रश्न छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhagan bhujbal slams manoj jarange patil about beed lathicharge and devendra fadnavis answer scj