एकीकडे राष्ट्रीय पातळीवर पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल काय लागणार? याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षातील फुटीचा मुद्दा तापला आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी चालू असताना निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरामध्ये मंत्री छगन भुजबळांनी थेट शरद पवारांवर शरसंधान केलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

यावेळी बोलताना छगन भुजबळांनी १९९९ साली स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचं विधान केलं. “आपला पक्ष नवीन नाही, जुना आहे. १९९९ साली स्थापन झालेला पक्ष हाच आहे. याच पक्षाचा पहिला प्रांताध्यक्ष छगन भुजबळ होता”, असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
raj thackeray cm devendra fadnavis
Raj Thackeray: …म्हणून राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी झाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “आमच्याकडे त्यांना…”!
Shivsena UBT Leader Vinayak Raut Criticized Ekanth Shinde
Vinayak Raut : “महायुतीत एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे, गरज असेल तर..”; ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याची टीका
devendra fadnavis nitin gadkari
फडणवीसांच्या निवडीवर गडकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्याच्या विकासाला …”

“एवढी चिडचिड का चाललीये हे काही मला कळलं नाही. सगळेच इकडे आले तर आम्ही काय करायचं? तुमचंही तेच तर चाललं होतं. २००४ सालीही तुमचं तेच चाललं होतं. तेव्हापासून चालूच आहे ना? यातल्या काही गोष्टी प्रफुल्ल पटेलांना माहिती आहेत. मला फार थोड्या गोष्टी माहिती आहेत. पण जेव्हा माहिती झालं, तेव्हा वाटलं की तळ्यात-मळ्यात करण्याऐवजी एकदाचा काय तो निर्णय घ्या”, अशा शब्दांत भुजबळांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला.

“जयंत पाटलांनी विचारलं आणि साहेब म्हणाले…”

“५४ आमदार आणि खासदारांनीही भाजपाबरोबर सरकार स्थापनेसंदर्भातील कागदावर सह्या केल्या. सगळी मंडळी जात होती. जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल विमानात तयार बसले होते. पण जयंत पाटलांना वाटलं की परत विचारायला जावं. पण मग साहेब म्हणाले थांबा, नका बसू विमानात. शिवाय हे एकदा झालेलं नाही. अनेकदा झालंय. तुम्ही एखाद्या पक्षाला एकदा हो म्हणून सांगितलं आणि नंतर तुम्ही मागे सरलात तर ते एकदा ठीक आहे. पण प्रत्येक वेळी तेच तेच घडतंय”, असा आरोपही त्यांनी शरद पवारांवर केला.

“…तर छगन भुजबळ मुख्यमंत्री बनतील”, मराठा-ओबीसी वादावर बच्चू कडूंचं सूचक विधान

“तुमची अडचण काय आहे?”

दरम्यान, आपण भाजपाबरोबर गेल्यामुळे अडचण काय झाली? असा सवाल भुजबळांनी शरद पवारांना केला आहे. “आम्ही काय आमचा पक्ष सोडलाय का? आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अडचण काय आहे? म्हणे मार्ग बदलला. नितीश कुमार भाजपाबरोबर जाऊन आले. काय झालं? आहेत तिथेच आहेत. जयललिता, नवीन पटनायक, मेहबुबा मुफ्तीही गेल्या होत्या. मग त्यांची विचारधारा बदलली का? आम्हीही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सरकारमध्ये गेलो. त्याआधी आम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर सरकारमध्ये गेलो. म्हणजे आम्ही शिवसेनेचे झालो का? नाही. तसं म्हटलं तर शिवसेना आणि भाजपा विचारधारा सारखीच आहे. मग तिकडे गेलं तर चालतं आणि इकडे गेलं तर चालत नाही असं कसं?” असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला आहे.

“आम्ही सगळे महाराष्ट्राच्या जनतेसाठी सरकारमध्ये गेलो आहोत. सत्ता काय, आम्ही अनेकदा मंत्री झालो आहोत. त्यात काय आहे? पण जनतेच अनेक प्रश्न आहेत. ते सोडवायला आम्ही गेलो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेनं आपल्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. न्यायालयीन लढाईही सुरू झाली आहे. तारीख पे तारीख चलता है. न्याय आपल्या बाजूनेच होईल”, असंही ते म्हणाले.

Story img Loader