Samta Parishad Baithak Chhagan Bhujbal : मराठ्यांना वेगळं आरक्षण द्या हे म्हणणारा पहिला नेता मी होतो. मला मराठा समाजाचे अनेक नेते येऊन भेटतात त्यांनी सांगितलं की हा प्रश्न सोडवला पाहिजे मी म्हटलं हा प्रश्न सोडवलाच पाहिजे पण एकमेकांवर कुरघोडी करुन किंवा आक्रमण करुन नको असं मी म्हटलं होतं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. समता परिषदेचा मेळावा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी त्यांची भूमिका मांडली. मंत्रिमंडळात स्थान नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. आता या भाषणात त्यांनी सगळ्याच गोष्टींवर भाष्य केलं.

काय म्हणाले छगन भुजबळ?

१० टक्के आरक्षण दिल्यानंतर देशभरातल्या इतर राज्यांमधली आंदोलनं शमली होती. मात्र मराठा समाज हा EWS मध्ये साडेआठ टक्के आहे. त्यामुळे त्यांचं नुकसान होतं आहे. हे माझं म्हणणं नाही हे त्यांचंच म्हणणं आहे. मी मार्ग काढायला तयार आहे, तुमच्याशी चर्चा करायला नाही. आपण कुणीही मराठा विरोधी नाही. आमच्यावर कुरघोडी करण्याचा जे कुणी प्रयत्न करत आहेत त्यांना विरोध करणं हे तुमचं आणि माझं काम असणार आहे. पुन्हा एकदा बीड होता कामा नये. आमदारांची घरं जाळा, शिक्षणसंस्था जाळा या घटना सहन केल्या जाणार नाहीत. त्यावेळी ते घडलं आणि मी त्या संकटात उभा राहिलो होतो. लोकच नाही तर नेते घाबरले होते त्यावेळी हा छगन भुजबळ उभा होता. असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले.

आपली मंडळी एक है तो सेफ है

आपण सगळे एकत्र झालो, ओबीसी मंडळी एकत्र आली. त्यामुळे एक है तो सेफ है हे आपल्याला अशाही पद्धतीने समजलं असंही छगन भुजबळ पुढे म्हणाले. आम्ही एक आहोत आणि सेफ आहोत हे लक्षात घ्या असंही भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे. आम्ही कधीही कुणाला विरोध केला नाही. आरक्षण मिळालं तेव्हा २५० जाती होत्या, आता ३७५ जाती आहेत. हे नाकारता येणार नाही.

राजकारणात आपली माणसं अजून कच्ची

छगन भुजबळ पुढे म्हणाले, निवडणुकीला आपण उभे राहिलो, अनेक लोक विधानसभेला उभे राहिले. आपले तर दोन-दोन लोकही उभे होते. अशा गोष्टी राजकारणात होत नाहीत. तुम्हाला निवडून यायचं असेल तर मजबूत काम पाहिजे. सगळ्या लोकांचा पाठिंबा पाहिजे, एखाद्या मोठ्या पक्षाचा पाठिंबा असेल तर अधिक चांगलं असतं. राजकारणात अजूनही आपली माणसं कच्ची दिसत आहेत. जे निवडून येतात ती आपली माणसं एक शब्दही बोलत नाही. त्यांचं काही चुकतं आहे असं मी समजणार नाही. माझ्याही मतदारसंघात एक महाशय सलाईन लावून आले. माझं काय होणार मला माहीत नाही या माणसाला म्हणजे मला पाडा असं त्याने सांगितलं. त्यामुळे माझी ६० ते ७० हजार मतं कमी झाली. हिंदू-मुस्लिम या सगळ्यांची मतं कमी झाली. दलित समाज, ओबीसी समाज, गुजराती समाज सगळे समाज एकजुटीने एकत्र आले आणि मला निवडून दिलं. असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) म्हणाले.

मला मंत्रिपदाची हाव असती तर…-भुजबळ

आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं. माझ्याविरोधात अर्वाच्य बोललं गेलं तेव्हा मी सांगितलं. प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही. “कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”. असा शेरही छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटला आणि आपली भूमिका मांडली.

Story img Loader