राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून सरकारकडून युद्धपातळीवरू काम सुरू आहे. मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचं काम प्रगती पथावर असून यामुळे असंख्य मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. परंतु, दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्यास ओबीसी नेत्यांनी प्रखर विरोध केला आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्याविरोधात आज आरक्षण बचाव सभा जालन्यात पार पडली. या सभेत सर्वपक्षीय ओबीसी नेते सहभागी झाले होते. यावेळी ओबीसी नेते, राष्ट्रवादीचे आमदार आणि सत्ताधारी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुफान तोफ डागली. तसंच, कायदा सुव्यवस्थेवरून सरकारलाही घरचा आहेर दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मराठा आरक्षण मिळत नाही तोवर पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठवाड्यातील अनेक गावांत नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे फलक लागले आहेत. तसंच, अनेक सत्ताधारी आमदारांच्या घरांना आग लावण्यावरून छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “मराठा समाजाकडून गावबंदी करण्यात आली. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. काय रे महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय रे.जशास तसं उत्तर द्यावं लागेल. मी सांगितलं करेंगे या मरेंगे. आणि तुमचा पाव्हना म्हणतो, बघा हा हिंसाचार आहे. करेंगे आणि मरेंगे हे महात्मा गांधींचं वाक्य आहे.”

हेही वाचा >> “आमदार-मंत्र्यांना गावबंदी करता, महाराष्ट्र तुमच्या…”, छगन भुजबळांचा ओबीसी सभेतून एल्गार

“पोलिसांना माझं सांगणं आहे की गावातील गावबंदीचे फलक हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. आमदार, राजकीय नेत्यांना गावात घ्यायचं नाही, दोन चार पोट्टी बोर्ड लावतात की गावात यायचं नाही आणि धांदल करतात. हे आता चालणार नाही. सरकार आहे की नाही, कायदा आहे की नाही? आणि तुम्ही पक्षपातीपणा कराल तर ओबीसीसुद्धा गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित, मुस्लिम, आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही”, असा घरचा आहेरही त्यांनी सरकारला दिला.